Advertisement

कुर्ल्यामधील 'हा' प्रसिद्ध भाग पालिकेने केला सील

कुर्ल्याचा समावेश असलेल्या बीएमसीच्या एल वॉर्डमध्ये एकूण 3258 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कुर्ल्यामधील 'हा' प्रसिद्ध भाग पालिकेने केला सील
SHARES

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने कुर्ल्यातील एचडीआयएल प्रीमियर कंपाऊंड परिसर सील केला आहे. कोहिनूर हॉस्पिटलसमोरील प्रवेशद्वारापासून एचडीआयएल कंपाऊंड सील केलं गेलं असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.  

एचडीआयएल प्रीमियर कंपाऊंडमध्ये सध्या एकूण 8700 लोक राहत आहेत. याआधी कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत गेल्यानंतर एचडीआयएलच्या आसपासच्या अनेक इमारती पालिकेकडून सील करण्यात आल्या आहेत. एचडीआयएल प्रीमियर कंपाऊंड परिसर प्रतिबंधित क्षेत्रात ठेवायचा का नाही याचा निर्णय 23 जूननंतर घेण्यात येणार असल्याचं पालिकेने सांगितलं आहे. 

कुर्ल्याचा समावेश असलेल्या बीएमसीच्या एल वॉर्डमध्ये एकूण 3258 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या विभागात एल वॉर्डचा समावेश होतो. येथील जवळजवळ 70 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. त्यामुळे येथील रुग्णसंख्या वाढतच आहे.  एल वॉर्डमध्ये एकूण 205 इमारती सील केल्या आहेत. तर  115 भाग कंटेनमेंट झोन आहेत.



हेही वाचा -

मुंबईत जी उत्तर, के पूर्व आणि एल वाॅर्डमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा