Advertisement

मुंबईत जी उत्तर, के पूर्व आणि एल वाॅर्डमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

मुंबईतील 13 वाॅर्डमधील प्रत्येकी रुग्णसंख्या 2400 च्या वर आहे. तर 8 वाॅर्डमधील रुग्णसंख्या 1 हजारांच्या वर आहे.

मुंबईत जी उत्तर, के पूर्व आणि एल वाॅर्डमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा आता 52 हजार 445 वर गेला आहे.  जी उत्तर (दादर, धारावी, माहीम), के पूर्व (अंधेरी पूर्व) आणि एल (कुर्ला) वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईतील 13 वाॅर्डमधील प्रत्येकी रुग्णसंख्या 2400 च्या वर आहे. तर 8 वाॅर्डमधील रुग्णसंख्या 1 हजारांच्या वर आणि 3 वाॅर्डमध्ये 600 ते 1 हजार कोरोना रुग्ण आहेत.  

मागील आठवडाभरापासून धारावीत २५ पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र, शुक्रवारी धारावीत कोरोनाचे २९ नवे रुग्ण आढळून आले. तसेच दोघांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाबाधितांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर येथील एकूण मृतांची संख्या ७७ इतकी झाली आहे. जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या 3229  इतकी झाली आहे. तर कुर्ल्याचा समावेश असलेल्या एल वॉर्डमधील रुग्णसंख्या 3258 झाली आहे. बी (सँडहर्स्ट रोड) आणि सी (मरीन लाइन्स) वाॅर्डमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे.  

10 जून पर्यंत मुंबईतील रोजचा रुग्णवाढीचा दर 2.82 टक्के राहिला आहे.  आर उत्तर (दहिसर) आणि पी उत्तर (मालाड) मध्ये या ठिकाणी रोजचा रुग्णवाढीचा दर सर्वाधिक अनुक्रमे 6 टक्के आणि 5.6 टक्के आहे. तर जीउत्तर (दादर),  ई (भायखळा) आणि  एफ उत्तर (माटुंगा) मध्ये रुग्णवाढीचा दर सर्वाधिक कमी  अनुक्रमे 1.5 टक्के आणि 1.4 टक्के इतका राहिला आहे. मुंबईतील दुप्पट रुग्णवाढीचा कालावधी आता 25 दिवसांवर गेला आहे. भायखळामध्ये दुप्पट रुग्णवाढीचा कालावधी 48 दिवस आहे. तर दादर विभागात हा कालावधी 46 दिवसांचा आहे.  आर उत्तर (दहिसर) मध्ये दुप्पट रुग्णवाढीचा कालावधी 
12 दिवस आणि प्रभाग पीउत्तर (मालाड) मध्ये 13 दिवस आहे. 



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा