Advertisement

मालमत्ता कर वसुलीसाठी बीएमसी आक्रमक; बीएमडब्ल्यू, ब्रीझा कार जप्त

मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात आता मुंबई महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये पालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या अलिशान कार जप्त केल्या आहेत.

मालमत्ता कर वसुलीसाठी बीएमसी आक्रमक;  बीएमडब्ल्यू, ब्रीझा कार जप्त
SHARES

मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात आता मुंबई महापालिकेने आक्रमक कारवाई सुरू केली आहे.  या कारवाईमध्ये पालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांच्या अलिशान कार जप्त केल्या आहेत. यामध्ये बीएमडब्ल्यू, ब्रीझा अशा कार आहेत. तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

एच पूर्व विभागातील ‘भारत डायमंड बोर्स’ यांच्याकडून २५ कोटी ८६ लाख रुपये, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ यांच्याकडून ३९ कोटी रुपये इतका मालमत्ता कर पालिकेने वसूल केला आहे. एम पश्चिाम विभागातील विकासक चंदुलाल पी. लोहना यांच्याकडे ३८ लाख ८० हजार ७०५ रुपयांचा मालमत्ता कर थकीत आहे. त्यांची कार जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी १९ लाख रुपये  जमा केले. 

 के पूर्व विभागातील अंधेरी येथील ‘सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क’ व ‘वरटेक्स बिल्डिंग’ यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्या. या कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी अनुक्रमे ९.६० कोटी रुपये व ३१ लाख रुपये भरले आहे. आय मॅक्स थिएटरने ७५ लाख रुपये मालमत्ता कर थकवला आहे. त्यांच्या मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. 

एम पश्चिम विभागातील युनिटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांच्याकडे १ कोटी १० लाख २२ हजार २४० रुपये इतकी थकबाकी असल्याने त्यांच्या मालकीची ब्रीझा कार जप्त करण्यात आली. तसंच त्यांचे   ऑफिस सील करून बांधकाम बंद करण्यात आले आहे. 

अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम सुरू आहे.  आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ५२०० कोटी रुपये मालमत्ता कर जमा करण्याचं लक्ष्य  पालिकेने ठेवलं आहे. रविवारपर्यंत ३६५० कोटी रुपये  कर जमा झाला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा