रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?

 Ghatkopar
रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?
रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?
रस्त्याची दुरुस्ती कधी होणार?
See all

घाटकोपर - पटेल चौकातील यशवंत शेठ जाधव मार्गावर मध्यभागी पडलेला खड्डा भरण्यासाठी लोखंडी पत्रा टाकल्याची बातमी नुकतीच ‘मुंबई लाइव्ह’नं दाखवली होती. नालेसफाईसाठी हा खड्डा करण्यात आला होता. बातमी दाखवल्यानंतर वॉर्ड ऑफिस आणि नगरसेविका राखी जाधव यांनी 19 डिसेंबरला काम करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र 22 तारीख आली तरी पालिकेकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता दुरुस्त होणार तरी कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्डा बुजवण्याऐवजी पत्रा टाकल्यानं त्याचा त्रास वाहन चालक आणि स्थानिकांना होतोय. त्यामुळे हे झोपलेलं पालिका प्रशासन जागं तरी कधी होणार असा सवाल स्थानिक विचारत आहेत.

Loading Comments