मुगभाट लेन बंद झाल्यानं रहिवासी त्रस्त

 Girgaon
मुगभाट लेन बंद झाल्यानं रहिवासी त्रस्त
मुगभाट लेन बंद झाल्यानं रहिवासी त्रस्त
मुगभाट लेन बंद झाल्यानं रहिवासी त्रस्त
See all

गिरगाव - महापालिकेनं डागडुजीसाठी गिरगावमधील मुगभाट लेन हा रस्ता बंद केला खरा, पण पाच दिवस झाले तरी डागडुजीचं काम सुरूच केलेलं नाही. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. संध्याकाळच्या वेळेत याठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे येथील रहिवासीही त्रस्त झाल्याचं दुकानदार यशवंत चाटी यांनी सांगितलं. त्यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी इथले रहिवासी करत आहेत. यासंदर्भात पालिका अधिकारी जिवक घेगडमल यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments