मुंबई – महाड दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील 274 उड्डाणपुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटींचा खर्च अपेक्षित असून या खर्चाच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट मार्गी लागणार आहे.
पालिकेच्या तांत्रिक समितीने सुचवल्यानुसार उड्डाणपुलांचे सर्वेक्षण करत पुलांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. पालिकेच्या अखत्यारीत 314 पूल असून यातील नवीन आणि पुनर्बांधणी करण्यात येणारे उड्डाणपूल वगळत 274 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल. या ऑडिटनुसार कोणत्या पुलाची दुरुस्ती करायची आणि कोणत्या पुलाचे नव्याने बांधकाम करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.