Advertisement

'या' तलावांमधील पाण्याची वाढवणार 'ऑक्सिजन लेव्हल'


'या' तलावांमधील पाण्याची वाढवणार 'ऑक्सिजन लेव्हल'
SHARES

मुंबईतील अनेक तलावांमध्ये गणेशमूर्तींचं विसर्जन होत असून यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होत असते. त्यामुळे अविघटनशील असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पाण्यातील माशांसह अनेक जैविके नष्ट होत आहेत. त्यामुळे आता या तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वतीनं केला जात आहे.


मासे मरण्याचे प्रमाण वाढले

मुंबईच्या मालाडमधील शांताराम तलाव आणि शीव तलावांमध्ये पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं मोठ्या प्रमाणात मासे मरण्याचे प्रकार घडले होते. तलावातील पाणी दूषित झाल्यानं त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणे आवश्यक असते. परंतु या तलावांमधील ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणाच नसल्यानं अनेकदा यातील मासे थंडीत मरण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे यासर्व तलावांमधील ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा उपलब्ध करून देत जैविक उपचार पद्घतीचा अवलंब केला जाणार आहे.


९२ लाखांचा खर्च

वांद्रे तलाव अर्थात स्वामी विवेकानंद तलाव, मुलुंडमधील मोरया तलाव, भांडुपमधील शिवाजी तलाव, शीव तलाव, मालाडमधील शांताराम तलाव आदी तलावातील पाण्याची गुणवत्ता यांत्रिक व जैविक उपाचाराने सुधारण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी प्रोबॅक टेक्नॉलॉजी (इंडिया) या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी वार्षिक ९२ लाखांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती आहे.


हेही वाचा -

हार्डवर्कर मुंबईकर!

लाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा