Advertisement

लाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त!

म्हाडाच्या लाॅटरीला विलंब झाला असला, तरी मुंबई मंडळानं लाॅटरीची तयारी पूर्ण केली असून जाहिरात प्रसिद्ध करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात १००० घरांच्या लाॅटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.

लाॅटरीच्या जाहिरातीला जून-जुलैचा मुहूर्त!
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून २००७ पासून ३१ मे रोजीच काढण्यात येणाऱ्या लाॅटरीमध्ये गेल्या वर्षापासून खंड पडला आहे. गेल्या वर्षी मुंबई मंडळाने ३१ मे चा मुहूर्त चुकवल्यानंतर यंदाही ३१ मे चा मुहूर्त चुकवण्याचा शिरस्ता कायम ठेवला आहे. त्यामुळं म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत परवडणाऱ्या दरात घर मिळवू पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या पदरी प्रतिक्षाच पडली आहे. इच्छुक गृहखरेदीदारांना लाॅटरीसाठी किमान महिन्याभराची महिन्यांची वाट बघावी लागू शकते. कारण यावेळची लाॅटरी जून-जुलैमध्ये काढण्यात येईल, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.


म्हाडाची तयारी पूर्ण

''लाॅटरीला विलंब झाला असला, तरी मुंबई मंडळानं लाॅटरीची तयारी पूर्ण केली असून जाहिरात प्रसिद्ध करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात १००० घरांच्या लाॅटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल,'' अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


म्हाडाचा संथ कारभार

मुंबईसारख्या महागड्या शहरात सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे म्हाडा. त्यामुळं गोर-गरीबांचे डोळे लागलेले असतात ते म्हाडाच्या लाॅटरीकडे. त्यानुसार यंदा २०१८ मध्ये मुंबईतील १००० घरांसाठी ३१ मे रोजी लाॅटरी काढण्यात येईल, असं मुंबई मंडळानं ६ महिन्यांपूर्वीच जाहीर केलं होतं. पण मुंबई मंडळाचा संथ कारभार, तयार घरांची टंचाई आणि लांबलेली घरांची शोधमोहीम यामुळं गेल्या वर्षीप्रमाणं यंदाही मुंबई मंडळानं ३१ मे चा मुहूर्त चुकवला.


लवकरच किंमती ठरतील

लाॅटरीला विलंब होत असल्यानं म्हाडावर चांगलीच टीका होत आहे. त्यामुळे मुंबई मंडळानं लाॅटरीचं चांगलंच मनावर घेतलं आहे. त्यानुसार मुंबई शहरासह उपनगरातील सुमारे १००० घरं मुंबई मंडळाने शोधून काढली असून या घरांच्या लाॅटरीसाठी जाहिरात काढण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. लवकरच घरांच्या किंमती निश्चित करत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळं आता सर्वसामान्यांची घराची प्रतिक्षा संपणार हे नक्की.


सर्व गटांचा समावेश

सुमारे १००० घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे. त्यादृष्टीनं सर्व तयारी सुरू झाली आहे. अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्वच गटातील घरांचा समावेश या लाॅटरीमध्ये असेल. आता घरांच्या किंमती निश्चित करण्याचं काम सुरू आहे. त्यानुसार जाहिरातीची सर्व प्रक्रिया पूर्ण करत जूनच्या शेवटच्या आठवड्यात वा जास्तीत जास्त जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल नि त्यानंतर ४५ दिवसानंतर म्हणजे आॅगस्टमध्ये लाॅटरी फुटेल.
-दीपेंद्र सिंग कुशवाह, मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, म्हाडाहेही वाचा-

म्हाडा झालं नियोजन प्राधिकरण, प्रकल्पांना मिळणार गती

मुंबईतल्या ७ उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक, रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवणारRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा