Advertisement

मुंबई मंडळाच्या लॉटरीत कोकण मंडळाचा खोडा

म्हाडाच्या मुंबई मंडळानं सहा महिन्यांपूर्वीच सुमारे 1000 घरांसाठी 31 मे 2018 मध्ये लॉटरी काढण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे इच्छुकांचे डोळे या लॉटरीकडे होते. पण नेहमीप्रमाणे मुंबई मंडळाच्या संथ कारभारामुळे ही लॉटरी रखडली आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र मुंबई मंडळाकडून लॉटरी लवकरच काढण्यात येईल, असं ठासून सांगितलं जात आहे. मात्र ही लॉटरी अजून पुढील काही महिने होण्याची शक्यता नसल्याची खात्रीलायक माहिती म्हाडातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

मुंबई मंडळाच्या लॉटरीत कोकण मंडळाचा खोडा
SHARES

मुंबई-ठाणे-नवी मुंबईतील इच्छुकांचं लक्ष लागलं आहे ते मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीकडे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं सहा महिन्यांपूर्वीच सुमारे 1000 घरांसाठी 31 मे 2018 मध्ये लॉटरी काढण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे इच्छुकांचे डोळे या लॉटरीकडे होते. पण नेहमीप्रमाणे मुंबई मंडळाच्या संथ कारभारामुळे ही लॉटरी रखडली आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र मुंबई मंडळाकडून लॉटरी लवकरच काढण्यात येईल, असं ठासून सांगितलं जात आहे. मात्र ही लॉटरी अजून पुढील काही महिने होण्याची शक्यता नसल्याची खात्रीलायक माहिती म्हाडातील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.
 


घरांना चांगला प्रतिसाद

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण मंडळानं सुमारे 4000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र याआधीचा अनुभव पाहता मुंबई मंडळाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची लॉटरी एकत्र काढली तर त्याचा फटका कोकण मंडळाला बसेल. याच भीतीनं कोकण मंडळानं मुंबई मंडळाच्या लॉटरीत खोडा घातल्याची जोरदार चर्चा सध्या म्हाडात आहे.

कोकण मंडळाची लॉटरी झाल्यानंतरच मुंबई मंडळानं लॉटरी काढावी यासाठी कोकण मंडळानं म्हाडा प्राधिकरणाकडं तगादा लावल्याचंही सुत्रांकडून सांगितलं जात आहे.



अर्जदारांचा कल मुंबईतील घरांकडे

म्हाडाच्या लॉटरीसाठी 15 हजारांपासून 75 हजारांपासून अनामत रक्कम (ईएमडी) भरावी लागते. ही रक्कम सर्वसमान्यांसाठी मोठी असते. असं असताना मुंबई मंडळ आणि कोकण मंडळाची लॉटरी एकाचवेळी झाली वा थोडी मागे पुढे झाली तरी त्याचा फटका कोकण मंडळाच्या लॉटरीला बसू शकतो. कारण दोन्ही ठिकाणी अनामत रक्कम भरणं इच्छुकांना शक्य होणार नाही. त्यातही घरं कमी असली तर अर्जदारांचा कल मोठ्या प्रमाणावर मुंबईतील घरांकडेच असतो. त्यामुळे मुंबईत एक हजार घरांसाठी लॉटरी असली तरी लाखोंनी अर्ज येतात. तर कोकण मंडळाची 4-5 हजार घरं असली तरीही 50-60 हजार अर्ज येतात. हीच बाब लक्षात घेत 'कोकण मंडळाकडून मुंबई मंडळाकडे लॉटरी कोकण मंडळाची लॉटरी झाल्यानंतर काढावी' असा तगादा लावला जात आहे. 


कोकण मंडळ म्हणतं 'होऊन जाऊ द्या'

कोकण मंडळाची लॉटरीची तयारी बऱ्यापैकी पूर्ण असून मुंबई मडंळाची तयारी दिसत नाही. त्यामुळेही कोकण मंडळाची लॉटरी होऊन जाऊ द्या, असं कोकण मंडळाचं म्हणणं आहे. दरम्यान याविषयी मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी संजय भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास नकार दिला आहे. तर आमच्या लॉटरीची तयारी सुरू असून लवकरच लॉटरी काढू असंही 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना स्पष्ट केलं आहे.

कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान इच्छुक लॉटरीची प्रतिक्षा करत असताना हे मंडळ 'पहले हम-पहले हम' करत राहिले तर ही प्रतिक्षा आणखी वाढेल असं चित्र आहे.


हेही वाचा - 

म्हाडा लाॅटरीच्या २५ बोगस वेबसाईट!

सरकारी घरांवर डल्ला मारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना चाप बसणार!

म्हाडाची यंदा 'परवडणारी' लॉटरी! अत्यल्प-अल्प गटासाठी ७८३ घरं!

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा