Advertisement

म्हाडाची यंदा 'परवडणारी' लॉटरी! अत्यल्प-अल्प गटासाठी ७८३ घरं!

यंदा अत्यल्प आणि अल्प गटासाठी मिळून तब्बल ७८३ घरं असणार आहेत. म्हणजेच, लाॅटरीतल्या घरांच्या संख्येतील ७५ टक्क्यांहून अधिक घरं या गटासाठी असणार आहेत, तर दुसरीकडे उच्च वर्गासाठी मात्र केवळ दोनच घरं असणार आहेत.

म्हाडाची यंदा 'परवडणारी' लॉटरी! अत्यल्प-अल्प गटासाठी ७८३ घरं!
SHARES

मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या परवडणाऱ्या दरात घरं मिळण्यासाठी लाखो मुंबईकर प्रतिक्षा करताहेत ते म्हाडाच्या लाॅटरीची! दरवर्षीप्रमाणे ३१ मे रोजी लाॅटरी फुटेल, असं म्हाडानं जाहीर केलं असलं, तरी मुंबईकरांना लाॅटरीसाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण, मुंबईकरांसाठी, त्यातही अत्यल्प-अल्प गटासाठी म्हाडानं खुशखबर दिली आहे. ती म्हणजे यंदा अत्यल्प आणि अल्प गटासाठी मिळून तब्बल ७८३ घरं असणार आहेत. म्हणजेच, लाॅटरीतल्या घरांच्या संख्येतील ७५ टक्क्यांहून अधिक घरं या गटासाठी असणार आहेत, तर दुसरीकडे उच्च वर्गासाठी मात्र केवळ दोनच घरं असणार आहेत.


महागड्या घरांसाठी म्हाडावर टीका

अत्यल्प-अल्प गटाच्या घरांची निर्मिती हेच म्हाडाचं मुख्य उद्दिष्ट असताना गेल्या काही वर्षांपासून म्हाडा या उद्दिष्टापासून दूर जाताना दिसत आहे. गेल्या तीन-चार वर्षांत अत्यल्प-अल्प गटाएेवजी मध्यम आणि उच्च गटासाठीच लाॅटरीत सर्वाधिक घरं काढली जात आहेत. त्यामुळे म्हाडावर प्रचंड टीका होत आहे.


घरांची आकडेवारी 'मुंबई लाइव्ह'च्या हाती

ही टीका लक्षात घेऊनच म्हाडानं २०१८ च्या लाॅटरीत अत्यल्प-अल्प गटाच्या घरांचा समावेश असेल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार म्हाडानं अशा घरांची शोधाशोध करत १००० घरांचा आकडा २०१८ च्या लाॅटरीसाठी गाठला असून ही प्रस्तावित आकडेवारी 'मुंबई लाइव्ह'च्या हाती लागली आहे. या आकडेवारीनुसार यंदाच्या लाॅटरीत अत्यल्प गटासाठी २८३ घरं असून अल्प गटासाठी तर तब्बल ५०० घरं असणार आहेत. हा आकडा नक्कीच इच्छुकांना सुखावणारा असल्याचं म्हटलं जात आहे.


उच्च गटासाठी पंतनगरमध्ये घरं

यंदा एकूण १००१ घरांची लाॅटरी फुटणार असून त्यातील ७८३ घरं अत्यल्प-अल्प गटासाठी आहेत. तर मध्यम गटासाठी २१६ घरं असणार आहेत. तर उच्च गटासाठी पंतनगरमधील केवळ दोन घरांचा समावेश आहे.


३१ मेचा मुहूर्त चुकणार...'मुंबई लाइव्ह'चं वृत्त ठरलं खरं!

म्हाडानं सहा महिन्यांपूर्वीच '३१ मे २०१८ ला किमान १००० घरांची लाॅटरी काढू' असं जाहीर केलं होतं. त्यानुसार म्हाडानं तयारी सुरू केली. १००१ घरंही शोधूनही काढली. पण या घरांच्या किंमती अजूनही निश्चित न झालेल्या नाहीत. शिवाय जाहिरातीची प्रक्रियाही रेंगाळली आहे. एप्रिलच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं. पण पुढचे दोन-तीन आठवडे तरी जाहिरात प्रसिद्ध होण्याची चिन्हं नाहीत. याविषयी म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी संजय भागवत यांना विचारले असता, त्यांनी 'जूनमध्येच लाॅटरी होईल', असे संकेत दिले आहेत. सहा दिवसांपूर्वीच मुंबई लाइव्हनं ३१ मे चा मुहूर्त चुकणार वृत्त दिलं होतं.


अल्प गटासाठीची घरं

लोकेशनघरं
पीएमजीपी, मानखुर्द११४
गव्हाणपाडा, मुलुंड२६९
प्रतिक्षानगर, सायन८४
सिद्धार्थ नगर, गोरेगाव२४
पंतनगर, घाटकोपर
टागोरनगर, विक्रोळी
एकूण५००


अत्यल्प गटासाठीची घरं

लोकेशनघरं
अॅन्टाॅप हिल, वडाळा२७८
दुरूस्ती मंडळाची
एकूण२८३


मध्यम गटासाठीची घरं

लोकेशनघरं
कन्नमवारनगर, विक्रोळी२८
महावीर नगर, कांदिवली१७२
पीएमजीपी, मानखुर्द१६
एकूण२१६


उच्च गटासाठीची घरं

लोकेशनघरं
पंतनगर, घाटकोपर
एकूण




हेही वाचा

पत्राचाळ प्रकल्प म्हाडाच्या ताब्यात, बिल्डरला मजबूत दणका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा