म्हाडा लाॅटरीच्या २५ बोगस वेबसाईट!

दलालांनी म्हाडाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल २५ बोगस वेबसाईट तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्याद्वारे इच्छुकांना गंडा घालण्याचा काळाधंदा दलालांनी सुरू केला आहे. इंटरनेटवर ही बाब लक्षात आल्याबरोबर म्हाडाच्या मुंबई मंडळानं याची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांकडे २५ वेबसाईटविरोधात लेखी तक्रार केल्याची माहिती म्हाडानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

SHARE

मुंबईसारख्या महागड्या शहरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे सर्वसामान्यांसाठी एकच पर्याय उरतो तो म्हणजे म्हाडाचा. परवडणाऱ्या दरात घर घेता येत असल्यानं इच्छुकांना प्रतिक्षा असते ती म्हाडाच्या लाॅटरीची. त्यामुळेच लाॅटरीत लाखोंनी अर्ज येतात. म्हाडा लाॅटरीतील घरांना असलेली मागणी लक्षात घेऊन काही दलालांकडून गरजूंची फसवणूकही केली जाते. त्यामुळे दलालांना चाप बसवण्यासाठी
म्हाडाकडून प्रयत्न होत असतानाच या दलालांनी आॅनलाईन फसवणुकीचा नवा फंडा शोधू काढला आहे. हा फंडा आहे लाॅटरीच्या बनावट वेबसाईटचा.


पोलिसांकडे लेखी तक्रार

दलालांनी म्हाडाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल २५ बोगस वेबसाईट तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून त्याद्वारे इच्छुकांना गंडा घालण्याचा काळाधंदा दलालांनी सुरू केला आहे. इंटरनेटवर ही बाब लक्षात आल्याबरोबर म्हाडाच्या मुंबई मंडळानं याची गंभीर दखल घेत सायबर पोलिसांकडे २५ वेबसाईटविरोधात लेखी तक्रार केल्याची माहिती म्हाडानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


परस्पर लाॅटरी  जाहीर

अर्जविक्री-स्वीकृतीपासून घराचा ताबा देण्यापर्यंत लाॅटरीची सर्व प्रक्रिया आॅनलाईन करण्यात येते. याचाच फायदा घेत अर्जदारांची फसवणूक करण्यासाठी बोगस वेबसाईट तयार करण्यात आल्या आहेत. मुंबई मंडळाकडून लवकरच १००१ घरांसाठी, तर कोकण मंडळाकडून ४००० घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे. अद्याप या लाॅटरीची कोणतीही आॅनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही की लाॅटरीची तारीखही जाहीर झालेली नाही. असं असताना काही वेबसाईटवर सप्टेंबर ते आॅक्टोबरदरम्यान अर्ज भरण्याची मुदत असल्याचं जाहीर देण्यात आलं आहे. काही वेबसाईटनं तर चक्क १० सप्टेंबर २०१८ ला लाॅटरी फुटणार असं जाहीरही केलं आहे.


आर्थिक फसवणुकीची शक्यता

यातून गृहखरेदीदारांची केवळ दिशाभूलच नव्हे, तर आर्थिक फसवणुकीचीही शक्यता असल्याने मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्या आदेशानुसार म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकाऱ्यांकडून बीकेसीतील सायबर पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. तर म्हाडाच्या लाॅटरीत फाॅर्म भरण्यास इच्छुकांनी या फसवेगिरीला बळी पडू नये, असं आवाहनही म्हाडानं केलं आहे.
इच्छुकांनी केवळ https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच हवी ती माहिती घ्यावी असं आवाहनही म्हाडाकडून करण्यात आलं आहे.


कशी तयार केली बनावट वेबसाइट?

बनावट वेबसाइट तयार करणाऱ्यांनी मूळ वेबसाइटवरील माहिती चोरली. त्यानंतर स्वतंत्र डोमेनच्या आधारे म्हाडाच्या नावाने बनावट वेबसाइट बनवली. या वेबसाइटवरील चुकीच्या माहितीला कुणीही बळी पडू नये. वैयक्तीक माहिती, बँकेचा तपशील, फोन नंबर कुणालाही देऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.हेही वाचा-

म्हाडाची यंदा 'परवडणारी' लॉटरी! अत्यल्प-अल्प गटासाठी ७८३ घरं!

म्हाडाची विरार फास्ट! विरार-बोळींजमधील ३३०० घरांची लाॅटरी लवकरचसंबंधित विषय
ताज्या बातम्या