SHARE

दरवर्षीप्रमाणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई शहरातील ७ उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत. या इमारतीत सध्या ४०३ भाडेकरू राहत असून त्यातील केवळ ११७ भाडेकरूंना संक्रमण शिबिरात हलवण्याची जबाबदारी आता दुरुस्ती मंडळावर आहे. त्यानुसार या भाडेकरूंना शक्य तितक्या लवकर संक्रमण शिबिरात हलवण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.

दरवर्षी दुरुस्ती मंडळाकडून पावसाळ्याआधी उपकर प्राप्त इमारतींचं सर्वेक्षण करत अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. तर त्या इमारतीतील भाडेकरूंना सुरक्षित स्थळी हलवलं जातं. त्यानुसार यंदा ७ उपकर प्राप्त इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.


कोणत्या इमारती ठरल्या अतिधोकादायक?

१) १४४ एम जी रोड अ ११६३० - ए विभाग
२) २०८-२२० काझी सययद स्ट्रीट - बी १ विभाग
३) १०१-१११ बारा इमाम रोड (उपकर क्र सी - ७२५५) - सी १ विभाग
४) ३०-३२ - २ री सुतार गल्ली उपकर क्र ६६२६ (१) - सी ३ विभाग
५) ६९-८१ खेतवाडी ३ री गल्ली गणेश भुवन (उपकर क्र डी १७६७) - डी २
६) ३९ चौपाटी सी फेस - डी ३ विभाग
७) ४६-५० क्लेअर रोड लकी मेशन - इ २ विभाग

भाडेकरूंनी जर या इमारतींमधून हलण्यास नकार दिला, तर इमारतींचं पाणी आणि वीज तोडण्यात येईल. त्यांनतरही भाडेकरू बाहेर न पडल्यास त्यांना पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने बाहेर काढण्यात येईल, असंही मेहता यांनी स्पष्ट केलं आहे.हेही वाचा

बीडीडी वरळीचा पुनर्विकास टाटाच्या हाती


संबंधित विषय
ताज्या बातम्या