Advertisement

बीडीडी वरळीचा पुनर्विकास टाटाच्या हाती

वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम टाटा कॅपेसिटी कंपनीला देण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुनर्विकासाचं प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बीडीडी वरळीचा पुनर्विकास टाटाच्या हाती
SHARES

नायगाव आणि ना.म. जोशी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यानंतर आता वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकासही मार्गी लागणार आहे. कारण वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम टाटा कॅपेसिटी कंपनीला देण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुनर्विकासाचं प्रत्यक्ष काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


निविदेत खोडा

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या निविदेचं गुऱ्हाळ मागील वर्षभरापासून सुरू होतं. एप्रिल २०१७ मध्ये वरळीच्या कामासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळानं जागतिक स्तरावर निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार टाटा कॅपेसिटीसह अन्य दोन जागतिक स्तरावरील कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. पण या निविदा प्रक्रियेत म्हाडाच्या चुकीमुळे आपल्याला निविदा सादर करता आली म्हणत शापुरजी पालनजी कंपनीनं निविदेत खोडा घातला.


म्हाडाच्या बाजूने निर्णय

आपली निविदा सादर करून घ्या असं म्हणत शापुरजी पालनजी कंपनीन थेट उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयानं म्हाडाच्या बाजूनं निर्णय देत शापुरजी पालनजी कंपनीला दणका दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळं साधारणत ४ महिन्यांपूर्वी वरळीच्या निविदा प्रक्रियेला लागलेलं वादाचं ग्रहण सुटलं.


निविदा अंतिम

त्यानंतर लागलीच मुंबई मंडळानं निविदा अंतिम करण्याच्या कामाला सुरूवात करत अखेर नुकतीच निविदा अंतिम करत टाटा कॅपेसिटी कंपनीला काम दिल्याची माहिती मुंबई मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याअनुषांगानं आता लवकरच वरळीच्या पुनर्विकासाच्या कामालाही सुरूवात होणार आहे.



हेही वाचा-

बीडीडीवासीयांनी पुन्हा सर्वेक्षण हाणून पाडलं

बीडीडीच्या पात्रता निश्चितीचा मार्ग मोकळा!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा