Advertisement

मुंबईतील पूर परिस्थितीची समस्या पालिका सोडवणार?

पूर टाळण्यासाठी पालिकेनं मिठी नदीत २८ फ्लडगेट्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील पूर परिस्थितीची समस्या पालिका सोडवणार?
(Representational Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) मिठी नदीत २८ फ्लडगेट्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नदीला येणारे पुराचे पाणी बाहेर येण्यापासून रोखता येईल.

दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीची पाण्याची पातळी ओव्हरफ्लो होते. यामुळे सायन, चुनाभट्टी, कुर्ला आणि घाटकोपर सारख्या भागात पूर येतो.

हिंदुस्तान टाईम्सनं एका वरिष्ठ अधिकार्‍यांचा हवाला देत म्हटलं आहे की, याचा उद्देश पाणी ओसंडून वाहू नये आणि निवासी भागात तसंच रेल्वे रुळांपर्यंत येऊ नये हा आहे. 

प्रशासकिय अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, हे फ्लडगेट्स माहीम खाडीपासून भरती-ओहोटीच्या ठिकाणी लावले जातील. त्यानंतर ते खाडीपासून मुंबई उपनगरात ८ किलोमीटर खोलवर लावले जातील.

प्रकल्प अधिकारी पी वेलरासू म्हणाले की, हे दरवाजे भरतीच्या वेळी वापरले जातील. हे दरवाजे पाणी बाहेर उपसताना नुकसान नियंत्रण म्हणून काम करतील.

त्यानंतर वेलरासू यांनी या प्रकल्पात तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी कशा प्रकारे स्वारस्य दाखवले आणि पालिकेला त्यांचे सादरीकरण कसे दिले यावर माहिती दिली. तथापि, अंतिम नियुक्ती पुढील १५ दिवसांत निविदांद्वारे केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवाय, प्राधिकरणाने तीन वर्षांच्या मुदतीसह प्रकल्पासाठी १,६०० कोटी रुपये खर्च येईल असा अंदाज लावला आहे.



हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा