Advertisement

मुंबईतील दुभाजक, पदपथांच्या कडेच्या दगडांची रंगरंगोटी

विभाग कार्यालयांच्या वतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार सध्या मुंबई ठिकठिकाणी ही कामे सुरु आहेत.

मुंबईतील दुभाजक, पदपथांच्या कडेच्या दगडांची रंगरंगोटी
SHARES

मुंबईमधील दुभाजक, पदपथांच्या कडेच्या दगडांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. तसंच, प्रमुख रस्त्यांच्या आजूबाजूच्या भिंतींवर कलात्मक चित्रे रंगवून त्या सुशोभित करण्यात येत आहेत. विभाग कार्यालयांच्या वतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार सध्या मुंबई ठिकठिकाणी ही कामे सुरु आहेत.

रस्त्यांवरील दृश्यमानता वाढावी, वाहनचालकांना सुरक्षितरितीने वाहन चालविता यावे आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, रस्ते परिसरांचे सुशोभीकरण व्हावे यादृष्टिने वेगवेगळ्या उपाययोजना करण्याचे निर्देश पर्यटन, पर्यावरणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका बैठकीवेळी दिले होते.

त्यानुसार महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयांना सूचना केल्या. 

या कामांच्या सुचना

  • रस्त्यांवरील मध्यवर्ती दुभाजकांची स्वच्छता करुन नव्याने रंगरंगोटी करणे.
  • दुभाजक अस्तित्वात नसल्यास शक्य त्या रस्त्यांवर दुभाजक बांधणे.
  • दुभाजकांमध्ये हिरवळ वा फुलझाडांची लागवड करणे.
  • वाहतूक बेटांचे सुशोभीकरण करणे. 
  • प्रमुख रस्त्यांवरील आजुबाजूच्या भिंतीवर कलात्मक रंगरंगोटी करणे चित्र रेखाटणे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा