ऐतिहासिक ट्राम पुन्हा येणार मुंबईकरांच्या भेटीला !

ट्रामची चेसी आणिक डेपोतून मिळणार असून ट्रामची डागडुजी करून तिला पुन्हा नवा साज देण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कामासाठी एकूण १४ लाख रुपये खर्च येणार आहे.

SHARE

मुंबई महापालिकेने मुंबईकरांच्या जुन्या आठवणींना ताजं करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी महापालिकेने ऐतिहासिक ट्रामची डागडुजी सुरू केली असून हे काम वर्षाखेरीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही ट्राम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) जवळील भाटीया बागेत प्रेक्षकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.


भाटीया बागेत ठेवणार

ट्रामची चेसी आणिक डेपोतून मिळणार असून ट्रामची डागडुजी करून तिला पुन्हा नवा साज देण्यासाठी महापालिकेने निविदा काढल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या कामासाठी एकूण १४ लाख रुपये खर्च येणार आहे. तसंच महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी 'ट्राम'ला भाटीया बागेत ठेवण्यासाठी नुकतीच मंजुरी दिली आहे.


कोलकताहून आणली

मुंबईमध्ये शेवटची ट्राम १९६४ मध्ये धावली होती. १९९३ मध्ये बेस्ट प्रशासनाचे जनरल मॅनेजर मनमोहन सिंग यांनी जुनी ट्राम मुंबईकरांना पाहता यावी म्हणून कोलकताहून एक ट्राम घेऊन येत ती आणिक बस डेपोतील संग्रहालयात आणून ठेवली. ही ट्राम १८७४ ते १९७ दरम्यान कोलकातामध्ये धावली होती.


फोटोही काढता येतील

काळानुरूप या ट्रामची अवस्था खराब झाल्याने तिला डागडुजीची आवश्यकता आहे. या ट्रामची डागडुजी बेस्टच्या वरळीतील वर्कशाॅपमध्ये करण्यात येणार आहे. या ट्राममध्ये ३२ जणांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून प्रेक्षकांना ट्राममध्ये बसून फोटोही काढता येणार आहे.हेही वाचा-

मुंबईतील ५ एसटी बस थांबे कात टाकणार

बोईसर-दिवा मेमू १५ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या