Advertisement

बोईसर-दिवा मेमू १५ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत


बोईसर-दिवा मेमू १५ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
SHARES

बोईसर ते दिवा दरम्यानच्या प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित सेवा पुरवणाऱ्या डीएमयू ७१००१ ही गाडी आता बंद करण्यात आली आहे. दहा वर्षांपुर्वी म्हणजे २००८ ला ही गाडी प्रवशांच्या सेवेसाठी दाखल झाली होती. मात्र, या डीएमयू गाडीच्या जागी आता मेमू धावणार असून अाहे. ही गाडी १५ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.


इंधनाची बचत

डीएमयू गाडी डिझेलवर चालत असून या गाडीचा वेग कमी होता. या गाडीला वेग पकडण्यासाठी खूप वेळ लागायचा. त्याचप्रमाणं धूर आणि आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणही व्हायचे. परंतू मेमू गाडी विजेवर चालणारी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होत असून ही गाडी वेगाने धावते. गेली दहा वर्षे डीएमयू गाडीला जसा प्रतिसाद मिळाला अशाच प्रकारचा प्रतिसाद मेमू गाडीला मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत अाहे.



हेही वाचा -

दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या ३८ विशेष गाड्या

एसी लोकलच्या तिकीट विक्रीत वाढ




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा