Advertisement

पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्यासाठी मुंबईत बसवणार मोठे पंप


पावसाळ्यात पाण्याच्या निचऱ्यासाठी मुंबईत बसवणार मोठे पंप
SHARES

पावसाळ्यात पावसाचं पाणी तुंबल्यानंतर त्याचा निचरा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी पंप लावण्यात येतात. या वर्षी १६ पंप कमी लावण्यात येणार अाहेत. मात्र मुंबईत ठिकठिकाणी बसवण्यात येणाऱ्या २७९ पंपांपैकी तीन पंपांची क्षमता ही ताशी एक हजार घनमीटर इतकी असणार अाहे. हे तीन पंप गांधी मार्केट, कुर्ला एलबीएस अाणि भाऊचा धक्का या ठिकाणी बसवण्यात येणार अाहेत. एक हजार अश्वशक्तीच्या पंपामुळे पाण्याचा उपसा जलद गतीनं होईल, असा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात अाला अाहे.


गेल्या वर्षी होते २९५ पंप


मुंबईतील सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पाच उदंचन केंद्र बांधण्यात आली असली तरीही अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे महापालिकेच्यातर्फे दरवर्षी पंपांची व्यवस्था करण्यात येते. गेल्या वर्षी २९५ पंप बसवण्यात आले होते. अाता पुढील दोन वर्षांमध्ये २७९ पंप बसवण्यात येणार अाहेत. त्यासाठी सुमारे ५५ कोटी रुपये खर्च होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली.


पालिकेकडून दोन पंपांची खरेदी


या एका पंपाबरोबरच एवढयाच क्षमतेचे दोन पंप महापालिकेच्या वतीनं खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामुळे हे तिन्ही पंप मोठ्या प्रमाणात पाणी साचत असलेल्या आणि तुलनेत धीम्या गतीने पाण्याचा निचरा होत असलेल्या गांधी मार्केट परिसर, कुर्ला एलबीएस मार्ग, आणि भाऊचा धक्का या परिसरात बसविण्यात येणार अाहेत.


मागील दोन वर्षांत बसवलेले पंप २९५
दोन वर्षांमध्ये पंपावर केलेला खर्च ३०.९५ कोटी रुपये
पुढील दोन वर्षांसाठी बसवण्यात येणारे पंप२७९
दोन वर्षांसाठी केला जाणारा खर्च५२ कोटी रुपये

हेही वाचा -

नालेसफाई होऊनही दक्षिण मुंबई तुंबणार!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा