सी विभागातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

Bhendi Bazaar
सी विभागातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
सी विभागातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
सी विभागातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
सी विभागातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
सी विभागातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई
See all
मुंबई  -  

मुंबई - महापालिकेच्या सी विभागाच्या हद्दीतील नळबाजार आणि भेंडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. जे जे मार्ग पोलीस हद्दीतील बिग्रेडिअर उस्मान मार्ग येथील पदपथावरील अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई केली. या कारवाईदरम्यान अनधिकृत स्टॉल्स, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत शेड, खाद्यपदार्थांची दुकाने, सरबतची दुकाने, सुकामेव्याचे स्टॉल्स या प्रकारच्या विविध अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.नळबाजारच्या मागच्या रस्त्यावरील एकूण 178 अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. या दोन्ही परिसरात झालेल्या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना मोकळे पदपथ मिळण्यासोबतच वाहतूकदेखील सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

सी विभागाचे सहाय्यक आयुक्त जिवक घेगडमल यांच्या नेतृत्वात पदपथावरील अतिक्रमणे आणि रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 178 अतिक्रमणे/अनधिकृत स्टॉल्स यासह अनधिकृत फेरीवाल्यांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले.

ही कारवाई करण्यासाठी जे.जे.पोलीस ठाण्यातील 40 पोलीस निरीक्षक आणि 15 महिला पोलीस शिपाई आणि महापालिकेचे 30 कामगार-कर्मचारी-अधिकारी कार्यरत होते. तसेच या कारवाईसाठी 1 जेसीपी, 4 ट्रक, 2 लॉरी वापरण्यात आल्या, अशी माहिती आयुक्त जिवक घेगडमल यांनी दिली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.