गिरगावमधील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई

Girgaon
गिरगावमधील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
गिरगावमधील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
गिरगावमधील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
गिरगावमधील अतिक्रमणांवर महापालिकेची धडक कारवाई
See all
मुंबई  -  

गिरगाव - महापालिकेच्या डी विभागाचे सहाय्यक आयुक्त देवदास क्षीरसागर यांच्या नेतृत्वात पदपथावरील अतिक्रमणे आणि रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नुकतीच धडक कारवाई करण्यात आली.गिरगाव परिसरातील केळकर मार्केट मार्गावरील पदपथावर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. यामुळे परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांना ये-जा करताना पदपथाऐवजी रस्त्याचा वापर करवा लागत होता. या सर्व बाबींमुळे रस्त्यावर काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी देखील होत होती. तसेच अनेक बेघरांनी देखील इथे आपले बस्तान मांडले होते. या त्रासाला कंटाळून या परिसरातील रहिवाशांनी वार्ड ऑफिसरकडे तक्रार केली होती.

या कारवाईदरम्यान 40 अनधिकृत स्टॉल्स तोडण्यात आले. तसेच 15 विनापरवाना फेरीवाल्यांचे साहित्य देखील जप्त करण्यात आले. ही कारवाई करण्यासाठी महापालिकेचे 20 कर्मचारी, अधिकारी यांच्यासह व्हीपी रोड इथले पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. तसेच या कारवाईसाठी 1 जेसीबी आणि 2 डंपर वापरण्यात आले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.