Advertisement

'मुंबई लाइव्ह'चा इम्पॅक्ट, वरळीतील अभ्यासगल्ली झाली मोकळी


'मुंबई लाइव्ह'चा इम्पॅक्ट, वरळीतील अभ्यासगल्ली झाली मोकळी
SHARES

सणवाराला होणाऱ्या गोंधळात दहा बाय दहाच्या खोलीत अभ्यास करणे शक्य नसल्यामुळे अनेक मुले वरळीतल्या अभ्यास गल्लीत अभ्यासाला बसतात. पण विद्यार्थ्यांच्या या अभ्यास गल्लीला अवैध पार्किंगचा विळखा बसला होता. याची बातमी 9 नोव्हेंबर 2017 रोजी 'मुंबई लाईव्ह'ने प्रसिद्ध केली होती. ज्याची दखल वाहतूक विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी घेतली आहे. आता त्यांनी 'अभ्यास गल्ली'तील पार्किंग हटवून तेथे अवैधरित्या उभ्या करण्यात आलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.


येथे 'नो पार्किंग'चा बोर्ड लागणार

या ठिकाणी आता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागा मोकळी झाल्यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'मुंबई लाईव्ह'च्या बातमीमुळे अभ्यास गल्ली पूर्ववत झाली आहे. वाहतूक शाखेने या ठिकाणचं पार्किंग हटवल्यानंतर महापालिका जी दक्षिण विभागानं या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड लावा' असे आदेश दिले आहेत.


अवैध पार्किंग हटवलं

या पार्किंगसाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून वरळी विधानसभेचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजीत पाटील यांनी या गल्लीचं नाव 2014 साली 'अभ्यास गल्ली' असे मंजूर करून घेतले. पण गेल्या काही दिवसांत या अभ्यास गल्लीला पार्किंगचं स्वरुप आलं होतं. पालिकेने दखल घेत तेथील अवैध पार्किंग हटवल्यामुळे अभिजित पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी 'मुंबई लाइव्ह'चे विशेष आभार मानले आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा