Advertisement

बहुमजली झोपड्यांवर शनिवारपासून हातोडा


बहुमजली झोपड्यांवर शनिवारपासून हातोडा
SHARES

मुंबई- वांद्र्यातील बेहमरामपाड्यात गुरुवारी बहुमजली झोपडी पडल्यानंतर अखेर मुंबई महानगरपालिकेला खडबडून जागी झाली आहे. त्यानुसार बहुमजली झोपड्यांविरोधात शनिवारपासून कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बेहरामपाड्यापासून या कारवाईला सुरूवात होणार आहे.
मालाड, धारावी, वांद्रे, कांदिवली, सांताक्रुझ, कुर्ला, गोवंडी, शिवडी, मानखुर्द, दहिसर,मरोळ अशा भागांत मोठ्या संख्येने बहुमजली झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये अंदाजे 70 लाख रहिवाशी राहतात. पालिकेच्या नियमानुसार 14 फुटांपर्यंत झोपड्यांची उंची वाढवता येते. मात्र गेल्या काही वर्षात झोपडपट्टीधारकांनी 14 फुटाच्यापुढे जात 20 फुटांपर्यंत उंची वाढवण्यास सुरूवात केली. त्यानंतर तर ही उंची 30 फुटांच्याही वर गेली आहे.
दरम्यान, 1 आक्टोबरपासून बहुमजली झोपड्यांविरोधात कारवाई करण्याचे पालिकेने जाहीर केले होते. पण राजकीय विरोध आणि पालिकेचे उदासीन धोरण यामुळे ही कारवाई झाली नव्हती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा