Advertisement

अंधेरीत उभारणार आॅलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल


अंधेरीत उभारणार आॅलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल
SHARES

मुंबईत पहिल्यांदाच आॅलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे हे संकुल अंधेरीतील वीरा देसाई रोड इथं बांधण्यात येणार आहे. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, मल्लखांब आणि व्हॉलीबॉल या खेळांचा त्यात समावेश असणार आहे. या खेळांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा पुरविल्या जातील.


टेंडर अंतिम टप्प्यात

महापालिकेने हे संकुल उभारण्यासाठी काढलेल्या टेंडरची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. निविदेला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला प्रत्यक्ष सुरूवात होईल. या संकुलाचं बांधकाम २०१८ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे.


सर्व खेळांना प्राधान्य

एकूण ४९ हजार चौरस मीटर जागेवर हे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. सध्या अंधेरीतील राजे शिवाजी क्रीडा संकुलात फुटबॉलला प्राधान्य दिलं जातं. पण नव्याने होणाऱ्या क्रीडा संकुलात सर्वच खेळांना समान न्याय देण्यात येईल.

या क्रीडा संकुलामुळे उपनगरातील क्रीडापटूंचा मोठा फायदा होणार आहे. मैदानी खेळासोबतच इथं जाॅगिंग, सायकलींगची देखील सुविधा उपलब्ध होणार आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी देखील इथं व्यवस्था करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा