'14 फुटांवरच्या झोपड्या पाडा'

 Pali Hill
'14 फुटांवरच्या झोपड्या पाडा'

मुंबई - मुंबईतील झोपड्यांच्या वाढत्या उंचीवर निर्बंध आणण्यासाठी मुंबई पालिकेने 14 फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर हातो़डा मारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईत अशा पालिकेच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतील किती झोपड्या आहेत याचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या झोपड्या पाडण्याच्या कारवाईला सुरूवात करा असे आदेश शनिवारी आयुक्त अजोय मेहता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता 14 फुटांपेक्षा उंच झोपड्यांवर हातोडा पडणार आहे.पालिकच्या अखत्यारीतील झोपड्यांविरोधात आधी कारवाई करण्यात येणार असून त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवरील झोपड्या पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Loading Comments