Advertisement

फॅक्टरीच्या परवाना शुल्कात 300 टक्क्यांनी वाढ


फॅक्टरीच्या परवाना शुल्कात 300 टक्क्यांनी वाढ
SHARES

मुंबई महापालिकेच्यावतीने आकारण्यात येणाऱ्या कारखाना (फॅक्टरी) परवाना शुल्क आणि नूतनीकरण शुल्कात आता 320 टक्क्यांनी वाढ होणार आहे. पर्यावरणीय शुल्कासाहित वसूल करण्यात येणाऱ्या या शुल्कात 300 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी 10  टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

कारखाना परवाना शुल्क अंतर्गत परवाना शुल्क, नूतनीकरण शुल्क, संयुक्त शुल्क, पर्यावरण छाननी शुल्क, हस्तांतरण शुल्क वसूल केले जाते. मागील शुल्कवाढ ही 2002 मध्ये झाली होती. त्यानंतर 15 वर्षांनी शुल्क वाढीचा निर्णय घेतला असून किंमतीतील सर्वसाधारण वाढ लक्षात घेऊन त्यानुसार विद्यमान शुल्कदारात सुमारे 315 ते 320 टक्के एवढी वाढ करण्यात येत आहे. महापालिकेच्या मंजुरी मिळाल्यानंतर ही वाढ लागू होणार असल्याचे विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी स्पष्ट केले. सध्या हा प्रस्ताव मंजुरीसाठी विधी समितीपुढे मंजुरीसाठी पाठवला आहे.


परवाना शुल्क :

  • विद्यमान शुल्क : 2100 ते  7700 रुपये
  • वाढ करण्यात येणारे शुल्क : 8780 रुपये ते 32, 170 रुपये


हस्तांतरण शुल्क :

  • विद्यमान शुल्क : 600 रुपये
  • वाढ करण्यात येणारे शुल्क : 2510 रुपये


ना हरकत प्रमाणपत्र शुल्क :

  • विद्यमान शुल्क : 600 ते 1500 रुपये
  • वाढ करण्यात येणारे शुल्क : 2510 ते 6270 रुपये



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा