Advertisement

केईएममध्ये पाणी साचल्याप्रकरणी पालिकेला नोटीस

उच्च न्यायालयाने पालिकेला ही नोटीस बजावली आहे.

केईएममध्ये पाणी साचल्याप्रकरणी पालिकेला नोटीस
SHARES

मुंबईमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे परळच्या केईएम रुग्णालयात पाणी साचले होते. या प्रकरणाची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. या प्रकरणात न्यायालयाने मुंबई महापालिकेला नोटीस जारी केली आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील हे चित्र चिंतेत टाकणारे आहे, असे वकील मोहीत खन्ना यांनी गुरुवारी उच्च न्यायालयास निर्दशनास आणून दिले.

शासकीय रुग्णालयांमधील दुरावस्थेबाबत दाखल सुमोटो याचिकेवर न्या. गौरी गोडसे आणि न्या. सोमशेखर सुंदरसेन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली.

यावेळी पालिका प्रशासनाशी बोलून तातडीनं काय उपाय करता येतील? याची माहिती सादर करण्याचे निर्देश हाय कोर्टाकडून सरकारी वकिलांना देण्यात आले होते. त्यानुसार सहाय्यक डीन हे आज सायंकाळी उशिरा उच्च न्यायालयात हजर झाले.

उच्च न्यायालयाने पालिकेला याबाबत तातडीने उपाययोजना करत अशी घटना पुन्हा होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश जारी केले आहेत. तसेच मुंबई महपालिकेलाही यात प्रतिवादी करण्याचे निर्देश जारी करत, केलेल्या उपाययोजना प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.



हेही वाचा

खड्डे भरण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसच सरसावले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा