• बोटीचा प्रवास झाला सोपा!
  • बोटीचा प्रवास झाला सोपा!
  • बोटीचा प्रवास झाला सोपा!
SHARE

बोरिवली - गोराईमध्ये बोटीत चढताना नागरिकांना त्रास होत होता आणि नागरिकांचा हाच त्रास दूर व्हावा म्हणून नगरसेवक शिवा शेट्टी यांच्या निधीतून सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आल्यात. गोराईपासून गोराई गाव आणि एस्सेल वर्ल्डला जाण्यासाठी नागरिकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. मात्र या बोटीत चढण्यासाठी कोणतीही व्यवस्था किनाऱ्यावर नव्हती. याचा त्रास वृद्धासह सगळ्यांना होत होता. त्यातच गोराईगावात राहणाऱे लोक रोज बोटीनं ये-जा करतात आणि त्यांना बोटीत चढण्या उतरण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर एस्सेल वर्ल्डलाही अनेक पर्यटक रोज ये जा करतात. त्यामुळे नागरिकांना चढता-उतरताना त्रास होऊ नये म्हणून या सिमेंटच्या पायऱ्या बांधण्यात आल्यात. याचबरोबर बोटीत दुचाकी नेण्यासाठीही किनाऱ्यावर व्यवस्था करण्यात आलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या