Advertisement

वांद्रामध्ये इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं

वांद्रामध्ये इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
SHARES

मुंबईतील (Mumbai) वांद्रे (Bandra) परिसरात मध्यरात्री 12.30 च्या सुमारास एक तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत एकाच मृत्यू झाला असून 16 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वांद्रे येथील शास्त्रीनगर (Shastri Nagar) परिसरात ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पोलीस, 1 रुग्णवाहिका आणि महापालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा