Advertisement

काळबादेवी इमारत दुर्घटनेत ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबईतील काळबादेवी परिसरात रविवारी संध्याकाळी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली.

काळबादेवी इमारत दुर्घटनेत ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
SHARES

मुंबईतील काळबादेवी परिसरात रविवारी संध्याकाळी इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. या घटनेत एका ६१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सुंदर शॉ असं या व्यक्तीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी इमारत कोसळण्यापूर्वी सर्व रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं होतं.

सुंदर शॉ हे कोसळलेल्या इमारतीमध्ये राहणारे रहिवाशी नव्हते. दुर्देवानं ते कामास्तव त्या इमारतीमध्ये गेले आणि त्याचवेळी काळानं त्यांच्यावर घाला केला. रविवारी संध्याकाळी काळबादेवी येथील दादी शेठ अग्यारी लेनमधील खंडरावाडी परिसरातील एका इमारतीचा काहीसा भाग कोसळला. त्यानंतर हळूहळू सर्व इमारत कोसळली.

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, इमारतीमधील सर्व रहिवाशांना वेळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली, असं कॉंग्रेस आमदार अमीन पटेल यांनी म्हटलं. या दुर्घटनेत ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो एक अंगारडिया कर्मचारी होता, असंही त्यांनी म्हटलं.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आढळेलल्या सुंदर शॉ यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा