पालिका निवडणुकीसाठी शिट्टी सज्ज

 Dahisar
पालिका निवडणुकीसाठी शिट्टी सज्ज

दहिसर - मुंबई महानगरपालिकेचे पडघम वाजू लागलेत. त्यामुळे सगळेच पक्ष कामाला लागलेत. मात्र आता बहुजन विकास आघाडीनेही निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. रविवारी कांदीवली, मालाड, दहिसर, बोरीवली, भागांत बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाचं उद्घाटन अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दहीसर कार्यालयाचे प्रमुख कमल सोनी यांनी आपण 25 वर्ष लोकांची सेवा करत आलोय. आता संधी मिळाली तर अजून चांगल्या पद्धतीनं सेवा करता येईल असं सांगत निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

Loading Comments