Advertisement

राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी; ५० टक्के महसूल जमा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे.

राणीच्या बागेत पर्यटकांची गर्दी; ५० टक्के महसूल जमा
SHARES

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात (राणीची बाग) पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. नवनवीन प्राणी दाखल झाल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटकांची राणी बागेची पसंती वाढली आहे. मुंबईकरांसह पर्यंटकांच्या राणीच्या बागेतील हजेरीमुळं महसुलातही चांगलीच वाढ झाली आहे.

नोव्हेंबरपासून मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत साडेसहा लाखांहून अधिक पर्यटकांनी राणीच्या बागेला भेट दिली आहे. या कालावधीत अडीच कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला आहे. केवळ ५ महिन्यात ५० टक्के महसूल जमा झाला आहे.

पेंग्विनच्या आगमनानंतर प्राणीसंग्रहायलयाचा महसूल आणि पर्यटकांची संख्या एकदम वाढली होती. मात्र, २ वर्षांनी हा भरदेखील ओसरू लागला होता. त्यातच मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागू झाल्यानंतर प्राणीसंग्रहायलयही पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.

५ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६ लाख ७७ हजाराहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहायलयाला भेट दिली. त्यामुळे २ कोटी ६९ लाख ८६ हजार रुपयांहून अधिक महसूल जमा झाला असल्याची माहिती मिळते. महापालिकेला आतापर्यंत वार्षिक जास्तीत जास्त साडेपाच कोटी रुपये महसूल कोरोनापूर्व काळात मिळाला आहे.

कोरोनापूर्वकाळात प्राणीसंग्रहालयात केवळ पेंग्विन हेच एक आकर्षण होते. मात्र आता शक्ती, करिश्मा ही वाघाची जोडी, अस्वल, हरणे, अजगर, तरस आणि विविध प्रकारचे पक्षीही पाहायला मिळत आहेत. प्राणीसंग्रहालयात सध्या नऊ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.

राणी बागेत पेंग्विन दाखल होताच पर्यटकांची संख्या साधारण ४० हजारापर्यंत पोहोचली होती. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता एक तिकिट खिडकी वाढवली असून तिकिट खिडक्यांची संख्या ४ करण्यात आली आहे. दरवर्षी येथे साधारण १२ लाखापर्यंत पर्यटक भेट देतात. पेंग्विनमुळे पर्यटकांची संख्याही वाढली. तसेच शुल्क वाढविल्यामुळे महसुलातही मोठी भर पडली आहे. सध्या लहान मुलांना २५ रुपये, प्रौढांना ५० रुपये तर कौंटुंबिक सहलींना एकत्रित १०० रुपये असे शुल्क आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा