Advertisement

बर्ल्ड फ्ल्यूच्या भीतीमुळे भायखळा प्राणीसंग्रहालय हाय-अलर्टवर

कोणत्याही पक्ष्यास लागण होऊ नये यासाठी भायखळा प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बर्ल्ड फ्ल्यूच्या भीतीमुळे भायखळा प्राणीसंग्रहालय हाय-अलर्टवर
SHARES

रिपोर्ट्सनुसार, राज्यभरात बर्ड फ्लूची भीती लक्षात घेता, कोणत्याही पक्ष्यास लागण होऊ नये यासाठी भायखळा प्राणीसंग्रहालयातील अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भायखळा प्राणिसंग्रहालयात २०० पेक्षा जास्त पक्षी आहेत. बर्ड फ्ल्यूच्या उद्रेक दरम्यान, अधिकारी अन्न देताना स्वच्छतेकडे अधिक ध्यान दत आहेत. याव्यतिरिक्त, पक्षी ज्या सामान्य वातावरणामध्ये ठेवले जातात त्यांचे देखील काळजीपूर्वक पालन केले जात आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, प्राणीसंग्रहालयातील अधिकारी पक्ष्यांना अन्न आणि औषध देण्यापूर्वी सेनिटायजेशन करत आहेत. याशिवाय हात-पाय देखील धुवत आहेत. पक्ष्यांच्या सुरक्षततेसाठी जास्तीत जास्त काळजी घेतली जात आहे.

दरम्यान, १० जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं चेंबूरमध्ये ११ मृत पक्ष्यांची तक्रार नोंदवली होती. ११ पक्ष्यांपैकी दोन पक्ष्यांचे नमुने रविवारी राज्याच्या पशुसंवर्धन विभागानं चाचणीसाठी पाठवले होते. सोमवारी दोन पक्ष्यांची बर्ड फ्ल्यूची चाचणी घेतल्याचं कळालं.

दुसरीकडे, सोमवारी यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला घाबरू नका असं आवाहन केलं. शिवाय, त्यांनी स्थानिक प्रशासनाला जागरुक राहण्याचे आणि सर्व खबरदारीच्या उपाययोजना घेण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केलं की, ज्या भागात बर्ड फ्लूची कोणतीही प्रकरणं आढळत नाहीत तिथं ते अंडी आणि कोंबडीचं सेवन करू शकतात.

शिवाय, बर्ड फ्ल्यूच्या बातम्यांमुळे, ११ जानेवारी, २०२१ रोजी कोंबडी-अंड्यांच्या किंमती आणि विक्रीत मोठी घट झाली आहे. अंड्याच्या किंमती १ नं कमी झाल्या आहेत. तर चिकनच्या किमतीत १० ते २० रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे.



हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा