Advertisement

मुंबई उपनगरात दाखला मिळवायचा असेल, तर या शिबिरात या!


मुंबई उपनगरात दाखला मिळवायचा असेल, तर या शिबिरात या!
SHARES

नुकताच 12 वीचा निकाल जाहीर झाला. लवकरच दहावीचा निकालही अपेक्षित आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विविध दाखले मिळवण्यास विद्यार्थी आणि पालकांची धावपळ होते. खरंतर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या अर्जामुळे दाखले वितरीत करण्यास विलंब होण्याची शक्यता असते. मात्र जर हे दाखले घराच्या जवळपासच आणि निश्चित केलेल्या तारखेलाच उपलब्ध करून दिले तर? तर निश्चितच पालक आणि विद्यार्थी वर्ग आनंदी होईल. आणि यासाठीच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी विद्यार्थ्यांना हे दाखल उपलब्ध होण्यासाठी विशेष दाखला वाटप महाशिबीराचे आयोजन केलं आहे.


हे दाखले मिळवा झटपट

विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उच्च उत्पन्न गटात मोडत नसल्याबद्दलचा दाखला (नॉन-क्रिमीलेअर सर्टिफिकेट), वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल), स्थानिक अधिवासाचा दाखला आणि उत्पन्न दाखला निश्चित तारखेला देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला तालुक्यांमध्ये येत्या जूनमध्ये भव्य महाशिबीरांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांच्या दाखल्यांशिवाय ज्येष्ठ नागरिकांनाही वयाचे प्रमाणपत्र या शिबीरांमधून वितरीत केलं जाणार आहे.

या तीनही तालुक्यांच्या तहसील कार्यालयातील सेतू कक्ष आणि महा-ई- सेवा केंद्रामध्ये 1 ते 29 जून या कालावधीत स्वीकारण्यात आलेल्या अर्जांचे दाखले विविध शिबिरांच्या ठिकाणी वितरीत करण्यात येतील.

विद्यार्थ्यांची दाखल्यांसाठी होणारी धावपळ आणि दाखले प्राप्त करण्यासाठी लागणारा विलंब लक्षात घेऊन या शिबीरांचे आयोजन केले आहे. अर्ज केल्यानंतर निश्चित शिबीराच्या ठिकाणी आपला दाखला हमखास मिळेल याची विद्यार्थ्यांनी खात्री बाळगावी. तोपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासाठी निश्चिंत मनाने तयारी करावी.

- सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर


अंधेरी विभागात 5 शिबीरे

  • अंधेरी तालुका सेतू कक्ष आणि महा-ई-सेवा केंद्रामध्ये 1 ते 7 जून दरम्यान स्वीकारलेल्या अर्जांसाठीचे सर्व दाखले 8 जून रोजी तहसील कार्यालयाच्या सेतू कक्षात वितरीत करण्यात येईल.
  • 9 ते15 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले 16 जून रोजी वांद्रे (पूर्व) येथील महात्मा गांधी विद्यालयात वितरीत केले जातील.
  • 17 ते 22 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले 23 जून रोजी अंधेरी (पूर्व) येथील गुंदवली म्युनिसीपल स्कूलमध्ये वितरीत केले जातील.
  • 24 जून रोजी जोगेश्वरी (पूर्व) येथील अरविंद गंडभिर विद्यालयात वितरीत केले जातील.
    24 ते 29 जून दरम्यानच्या अर्जांसाठीचे दाखले 30 जून रोजी अंधेरी (पूर्व) येथील आर. सी. मारुती विद्यालयात वितरीत केले जातील.


बोरीवली विभागात 10 शिबीरे

  • 3 जून रोजी चारकोप, कांदिवली (प.) येथील एन. डी. पाटील विद्यालय
  • 7 जून रोजी मागाठाणे, बोरीवली (पू.) येथील योजना विद्यालय
  • 9 जून रोजी कांदिवली (प.) येथील वळणई वसाहत म्युनिसीपल स्कूल
  • 13 जून रोजी मालाड (प.) येथील हिरादेवी मुख्य मंदिर सभागृह
  • 16 जून रोजी मालाड (प.) येथील ज्ञानसाधना विद्यालय
  • 20 जून रोजी तीनडोंगरी, गोरेगाव (प.) येथील 163 गोरेगाव विधानसभा मतदार संघ समाज मंदीर सभागृह
  • 23 जून रोजी आनंद नगर, दहिसर (पू.) येथील मातृछाया स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज
  • 26 जून रोजी मालाड (पू.) येथील निर्मला स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज
  • 28 जून रोजी मालवण्णी गेट न. 6, मालाड (पू.) येथील मदर तेरेसा स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज
  • 30 जून रोजी बोरीवल (प.) येथील सेंट रॉक्स स्कूल आणि कॉलेज येथे दाखले वितरीत करण्यात येतील


कुर्ला विभागात 4 शिबीरे

कुर्ला तालुका सेतू कक्ष आणि महा-ई-सेवा केंद्रामध्ये 1 ते 7 जून दरम्यान स्वीकारलेल्या अर्जांसाठीचे सर्व दाखले 8 जून रोजी कुर्ला तहसील कार्यालयाच्या सेतू कक्षात वितरीत करण्यात येणार आहे.

  • 9 ते 15 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले दि. 16 जून रोजी विद्याविहार (प.) येथे असलेल्या मंडळ अधिकारी कुर्ला व तलाठी कार्यालयामध्ये वितरीत केले जातील.
  • 17 ते 22 जूनदरम्यान स्वीकारलेले दाखले 23 जून रोजी आणिक गाव, वाशी नाका, चेंबूर येथील म. न. पा. शाळेत वितरीत केले जातील
  • 24 ते 29 जून दरम्यानच्या अर्जांसाठीचे दाखले 30 जून रोजी मुलुंड (प.) येथील तहसील कार्यालयासमोरील मंडळ अधिकारी घाटकोपर व तलाठी कार्यालयातून वितरीत केले जातील.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा