
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वे (CR) कडून मुंबई आणि पुणे येथून नागपूर आणि गोवाच्या दिशेने 8 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
तपशील पुढीलप्रमाणे:
गाडी क्रमांक 01021 ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 03 एप्रिल 2026 रोजी पहाटे 00.55 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.45 वाजता नागपूरला पोहोचेल. (1 फेरी)
गाडी क्रमांक 01022 ही नागपूरहून 03 एप्रिल 2026 रोजी रात्री 20.00 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी 11.45 वाजता LTT येथे पोहोचेल. (1 फेरी)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी (01022 साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
रचना: 1 एसी-2 टियर, 6 एसी-3 टियर, 9 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड ब्रेक व्हॅन, 1 जनरेटर व्हॅन.
गाडी क्रमांक 01467 ही पुणे रेल्वे स्टेशन येथून 03 एप्रिल 2026 रोजी 15.50 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी 06.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01468 ही नागपूरहून 04 एप्रिल 2026 रोजी 08.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.30 वाजता पुण्यात पोहोचेल.
थांबे: उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
रचना: 2 एसी-2 टियर, 4 एसी-3 टियर, 8 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास, 1 गार्ड ब्रेक व्हॅन, 1 जनरेटर व्हॅन.
गाडी क्रमांक 01129 ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 03 व 05 एप्रिल 2026 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.15 वाजता मडगावला पोहोचेल. (२ फेऱ्या)
गाडी क्रमांक 01130 ही मडगावहून 03 व 05 एप्रिल 2026 रोजी 16.00 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी 03.45 वाजता CSMT येथे पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कर्मळी.
रचना: 1 एसी-2 टियर, 5 एसी-3 टियर, 10 स्लीपर, 4 जनरल सेकंड क्लास, 2 गार्ड ब्रेक व्हॅन.
या विशेष गाड्यांसाठी (01021/22, 01467/68, 01129/30) आरक्षण 24 मार्च 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू झाले आहे.
अनारक्षित डब्यांसाठी तिकीट UTS प्रणालीद्वारे काढता येईल. प्रवासी RailOne अॅपचाही वापर करू शकतात.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES अॅपचा वापर करावा.
हेही वाचा
