Advertisement

मुंबईतील खड्ड्यांविरुद्ध नागरिकांचा 'रोड' मार्च

मुंबई खड्ड्यांनी भरली असून, हे खड्डे भरण्यात यावेत यासाठी मुंबईत रोड मार्च मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मुंबईतील खड्ड्यांविरुद्ध नागरिकांचा 'रोड' मार्च
SHARES

ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे धोकादायक ठरत असून, प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. त्याशिवाय, पावसाळा संपत आला तरी अद्याप मुंबईतले खड्डे महापालिकेनं भरलेले नाहीत. परिणामी संपूर्ण मुंबई खड्ड्यांनी भरली असून, हे खड्डे भरण्यात यावेत यासाठी मुंबईत रोड मार्च मोहीम हाती घेण्यात आली आहे.

या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आलं आहे. मागील ३ महिन्यांपासून मुंबईच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात तर रस्त्यांत खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ता आहे हेच समजेनासे झाले आहे. रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा त्रास होत असतानाच मुंबईत ठिकठिकाणी कंत्राटदारांनी केलेली रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असल्यानं याचाही त्रास मुंबईकरांना होतो आहे.



हेही वाचा -

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, अडीच लाखांवरून १५ लाखांवर

राज्यातील सर्व CET परीक्षा ऑक्टोबरमध्ये, 'या' तारखेवर होऊ शकते शिक्कामोर्तब


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा