Advertisement

बंद केलेला सिमेंट प्लांट पुन्हा सुरू


बंद केलेला सिमेंट प्लांट पुन्हा सुरू
SHARES

मालाड – मालवणी मार्वे रोड येथील बंद करण्यात आलेला सिमेंट प्लांट पुन्हा सुरू झाला आहे. या मुळे होणाऱ्या प्रदूषणाने त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी सहा महिन्यांपूर्वी आंदोलन केलं. याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मार्वेतील सिमेंट प्लांट प्रदूषणाला कारणीभूत ठरवून नोटिस बजावली होती. त्यानंतर हा प्लांट बंद पडला होता. मात्र त्यातील प्रिझम सिमेंट लिमिटेड हा प्लांट पुन्हा सुरू झाल्याचं समोर आलंय. याबाबत सेव्ह अवर लॅंड या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गर्ग परेरा यांनी संबंधित कंपनीकडे प्लांट सुरू करण्यासंबंधीच्या परवानगी पत्राची विचारणा केली. मात्र अद्याप त्यांना कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं कंपनीनं सांगितलं. त्यामळं याबाबत परेरा यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे की, 'रहिवासी वसाहतीत सिमेंट प्लांट नको, तो ताबडतोब बंद करण्यात यावा, अन्यथा आधीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा