Advertisement

२६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेल्वेच्या सुविधांचं उद्घाटन


२६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रेल्वेच्या सुविधांचं उद्घाटन
SHARES

एलफिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांसाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या. रेल्वे स्थानकांवर अशी दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून स्थानकांतील पादचारी पुलांचं काम तात्काळ हाती घेण्यात आलं. पादचारी पुलासह सरकत्या जिन्यांची संख्या वाढवण्यात आली. या सर्व नव्याने देण्यात येणाऱ्या सुविधांचं उद्घाटन २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सीएसएमटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक.१८ येथे मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सुविधांचं लोकार्पण होणार आहे.


कुठल्या सुविधांचं लोकार्पण?

  • पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट आपात्कालीन वैद्यकीय कक्ष, तिकिट आरक्षण केंद्र
  • सीएसएमटी, ठाणे, नेरळ, टिळक नगर स्थानकावरील पादचारी पूल
  • सांताक्रूझ स्थानकातील पादचारी पूल
  • लोअर परळ, बोरीवली स्थानकातील पादचारी पूल

एल्फिन्स्टन रोड, विद्याविहार स्थानकातील पादचारी पूलांवरील गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त पर्यायाची जोडणी करण्यात येत आहे. ठाणे आणि दादर स्थानकांत प्रत्येकी दोन सरकते जिने बसवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.

दादर स्थानकासह मानखुर्द आणि बोरीवली स्थानकात प्रत्येकी २ लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावरील गोवंडी आणि मध्य मार्गावरील टिटवाळा स्थानकात आपत्कालीन कक्ष, किंग्ज सर्कल येथे तिकिट आरक्षण केंद्र, वडाळा रोड आणि बदलापूर स्थानकात मोफत वाय-फाय अशा सुविधांचे लोकार्पण देखील प्रजासत्ताक दिनानिमित्ताने करण्यात येणार आहे.


४ स्थानकांत सौरऊर्जा यंत्रणा   

ग्रॅंटरोड, विरार कारशेड, लोअर परळ आणि माहीम स्थानकात सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. त्याचंही उद्घाटन शुक्रवारी होणार आहे. तसंच, मध्य रेल्वेच्या ५२ रेल्वे स्थानकांवर एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. तर, उर्वरीत ३० स्थानकांवर मार्च २०१८ पर्यंत एलईडी दिवे कार्यान्वित होतील, अशी माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.



हेही वाचा-

एल्फिन्स्टन ब्रिजचा प्रवाशांकडूनच वापर सुरु, अधिकृत घोषणा मात्र नाही!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा