Advertisement

घरगुती पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी झाल्या

व्यावसायिक सिलिंडर सलग दुसऱ्या महिन्यात स्वस्त झाले.

घरगुती पाठोपाठ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी झाल्या
SHARES

घरगुती गॅस सिलिंडरपाठोपाठ आता व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दरही कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस मोदी सरकारने महिलांना रक्षाबंधन भेट म्हणून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर आज व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातही कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडर सलग दुसऱ्या महिन्यात स्वस्त झाले आहेत.

मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या 2 महिन्यांत 251 रुपयांनी घट झाली आहे. त्याचा दर जुलैमध्ये 1733 होता. सणासुदीच्या काळात हा दर कमी करण्यात आला आहे. 19 किलोच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत 100 रुपयांहून अधिक कपात करण्यात आली असून, त्याचे दर 1482 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

व्यावसायिक एलपीजी गॅसचे नवीन दर

मुंबई - 1482 रु

दिल्ली - रु. 1522.50

कोलकाता - रु. 1636

चेन्नई - रु. 1695

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवे दर १ सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे 10 कोटी लाभार्थ्यांना 200 रुपयांची सबसिडी आधीच दिली जात आहे. यानंतर त्यांना प्रति सिलिंडर ४०० रुपयांचा फायदा मिळतो. त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना आता ९०३ रुपयांचा गॅस सिलिंडर ७०३ रुपयांना मिळणार आहे.



हेहाी वाचा

घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त

वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट वापरणाऱ्यांची आता खैर नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा