Advertisement

मेट्रो स्टेशनबाहेर भाड्याने सायकल मिळणार, प्रतितास २ रुपये दर

मुंबईकरांनी सायकलकडे वळावे, यासाठी मुंबई वन मेट्रोने (Mumbai Metro one) ही आयडिया राबवली आहे.

मेट्रो स्टेशनबाहेर भाड्याने सायकल मिळणार, प्रतितास २ रुपये दर
SHARES

वर्सोवा-घाटकोपर मेट्रोने (Versova-Ghatkopar Metro) प्रवास करणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना जागृतीनगर मेट्रो स्टेशनच्या बाहेर दोन रुपयात भाड्याने सायकल (Cycle) उपलब्ध होणार आहे. रविवारी या सायकल योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मुंबईकरांनी सायकलकडे वळावे, यासाठी मुंबई वन मेट्रोने (Mumbai Metro one) ही आयडिया राबवली आहे. 

मुंबईकरांना कमी अंतराच्या प्रवासासाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. भविष्यात मेट्रोच्या (metro) इतर स्थानकांवरही सायकली भाड्याने देण्याचा एमएमआरडीए विचार करेल. तसंच एमएमआरडीए (mmrda) अंतर्गत येणाऱ्या मेट्रो प्रकल्पांसाठी वेगळे सायकल ट्रॅकही (cycle track) देण्यात येतील. मेट्रोचे प्रवासी मायबीक अ‍ॅपचा वापर करून, या सायकल सेवेचा लाभ घेऊ शकतात. मुंबई मेट्रो वनने (Mumbai Metro one) मायबायक कंपनीबरोबर भाड्याने सायकली पुरवण्यासाठी करार केला आहे.  प्रवास करण्याव्यतिरिक्त आपल्या लोकप्रिय शॉपिंगच्या ठिकाणी भेट देण्यासाठी सायकल प्रवास हा पर्याय ठरु शकणार आहे. सध्या मुंबईत प्रवासासाठी सायकलींचा वापर फारच सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या सायकल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई मेट्रो वनसुद्धा या प्रयत्नात सामील झाली आहे, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीए आयुक्त आर. ए राजीव यांनी दिली आहे. 

मुंबईतील बिघडलेली वाहतूक, रेल्वेमधली गर्दी, वाढते ट्रॅफिक जाम, इंधनाचे वाढते दर, यांवर मात करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई शहरात सायकल चळवळ राबविण्याची तयारी एमएमआरडीएने (mmrda) केली आहे. मुंबईकरांनी या उपक्रमास साथ दिल्यास, बाइक शेअरिंगचा पर्यायही एमएमआरडीएच्या विचाराधीन आहे. या प्रणालीमध्ये मेट्रो स्थानकांच्या परिसरात पार्किंग सुविधेसोबतच बाइक स्टेशन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सायकल (cycle) चळवळीला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास, सेल्फ-ड्रिव्हन-सायकल-कॅब या संकल्पनेचाही भविष्यात विचार करण्यात येणार आहे. यात मेट्रो स्टेशन ते इच्छित स्थळी जाण्याकरिता आणि तेथून परत येण्याकरिता बाइक सायकलचा पर्याय एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.हेही वाचा -

कोस्टल रोड विरोधात कोळीबांधवांची पुन्हा याचिका

वर्षात आगीच्या दुर्घटनांमध्ये १७९ जणांचा मृत्यू
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement