Advertisement

वर्षात आगीच्या दुर्घटनांमध्ये १७९ जणांचा मृत्यू

मुंबईत रोज झाड (tree) पडणे, संरक्षक भिंत पडणे, आग (fire) लागणे अशा विविध दुर्घटना घडत असतात. यापैकी आगी लागण्याचं प्रमाण अधिक आहे.

वर्षात आगीच्या दुर्घटनांमध्ये १७९ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईत रोज झाड (tree) पडणे, संरक्षक भिंत पडणे, आग (fire) लागणे अशा विविध दुर्घटना घडत असतात. यापैकी आगी लागण्याचं प्रमाण अधिक आहे. विविध दुर्घटनांमध्ये वर्षभरात १७९ जणांचा मृत्यू (death) झाला आहे.  तर ७२२ नागरिक जखमी झाले आहेत.

मागील आठवड्यात मुंबईत जीएसटी भवन (gst bhavan) आणि अंधेरी एमआयडीसीमध्ये (andheri midc) भीषण आग (fire) लागली होती. दरवर्षी मुंबईत सरासरी साडेचार हजार आगीच्या घटना घडत आहेत. २०१९ मध्ये मुंबईत तब्बल १३,१५० दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे झाली आहे. पावसाळ्यात दुर्घटनांचे प्रमाण अधिक असते.  यामध्ये वृक्ष कोसळणे, घर कोसळणे, घरांच्या भिंती, इमारतींचे भाग कोसळणे, गॅस गळती होऊन सिलिंडर स्फोट, नाले, मॅनहोल, नदी, समुद्र-खाडी, विहीर, खदानी, पूल, मॅनहोलमध्ये पडून, रस्त्यावर अपघात अशा दुर्घटना घडत असतात.

 मुंबईत शॉर्टसर्किटमुळे पाच हजार २५४ ठिकाणी आगी लागल्या. यामध्ये ३८ लोकांचा मृत्यू (death) तर २१६ नागरिक जखमी झाले आहेत. घर, घरांचे भाग, भिंती, इमारती, इमारतींचे भाग कोसळण्याच्या एक हजार तीन दुर्घटनांमध्ये ५७ जणांचा मृत्यू तर २९९ लोक जखमी झाले आहेत. झाडे, झाडांच्या फांद्या पडणे, ४९३७ दुर्घटनांची नोंद झाली आहे. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर ४२ लोक जखमी झाले आहेत. समुद्रात, नाल्यात, नदीत, विहिरीत, खाडीत, खदानात, मॅनहोलमध्ये पडण्याच्या १२८ दुर्घटनांची नोंद झाली आहे़ त्यात ६२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० जण जखमी झाले आहेत.



हेही वाचा -

कोस्टल रोड विरोधात कोळीबांधवांची पुन्हा याचिका

शाळेतील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षेचे धडे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा