Advertisement

शाळेतील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षेचे धडे

अन्नसुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं (एफएसएसएआय) शाळेतील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेतील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षेचे धडे
SHARES

शाळेतील विद्यार्थी दिवसेंदिवस जंकफूड मोठ्या प्रमाणात खातात. शाळेच्या मधल्या सुट्टीत पोषक आहार न घेता, विद्यार्थी जंकफूडचं सेवन करतात. त्यामुळं या जंकफूडच्या सेवनावर मात करण्यासाठी वेळोवेळी सूचना केल्या जातात. मात्र, काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आता अन्नसुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं (एफएसएसएआय) शाळेतील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना अन्नसुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुले शाळेत किंवा कॉलेजमध्ये डबा घेऊन गेली नाहीत की कॅन्टीनचा पर्याय असतो. शाळा आणि महाविद्यालयातील अनेक मुलं सतत कॅन्टीमधील अन्न खातात. त्यामुळं कॅन्टीनमधील अन्न स्वच्छ आणि खाण्यासाठी सुरक्षित असावं, यासाठी आता शाळा आणि महाविद्यालयांतील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मार्चअखेरीच्या आधी शाळा आणि कॉलेजांमधील कॅन्टीन कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्याबाबतची माहिती अन्नसुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं शिक्षण संस्थांना दिली आहे. मुख्य म्हणजे या कर्मचाऱ्यांना एफएसएसएआयच्या अधिकृत प्रशिक्षकांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

कॅन्टीनकडे अन्नसुरक्षा आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र नसताना खाद्यपदार्थांची विक्री केल्यास २ ते ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. यात कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना अन्न शिजवताना बाळगण्याच्या स्वच्छतेबाबत धडे दिले जाणार आहेत. त्याचप्रमाणं विद्यार्थ्यांकडून अन्नाच्या गुणवत्तेबाबत अभिप्रायही घेण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. एफएसएसएआयच्या म्हणण्यानुसार, अन्नसुरक्षा आणि मानकं कायदा २००६ नुसार, खाद्यपदार्थ तयार करणारी व्यक्ती किंवा त्यासंदर्भातील व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला प्रशिक्षण मिळणे अनिवार्य आहे.



हेही वाचा -

मोटरमनमुळं वाचला 'त्या' तरुणाचा जीव

कोस्टल रोड विरोधात कोळीबांधवांची पुन्हा याचिका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा