Advertisement

मोटरमनमुळं वाचला 'त्या' तरुणाचा जीव

रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या २९ वर्षीय प्रवाशाला सीएसएमटी-पनवेल लोकलवरील मोटरमन व गार्डनं मदतीचा हात दिला.

मोटरमनमुळं वाचला 'त्या' तरुणाचा जीव
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत असून, असे अपघात रेल्वे मार्गावर सतत घडत असतात. मात्र, काहीवेळा रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीस व प्रवासी या प्रवाशांच्या मदतीला धावून येतात व त्यांना जीवदान देतात. अशीच एक घटना हार्बर रेल्वे मर्गावर घडली आहे.

रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत पडलेल्या २९ वर्षीय प्रवाशाला सीएसएमटी-पनवेल लोकलवरील मोटरमन व गार्डनं मदतीचा हात दिला. विनायक परब असं या तरुणाचं नाव आहे. या जखमी तरुणाला लोकलमधून प्रवाशांच्या मदतीनं कुर्ला स्थानकापर्यंत नेलं. त्यानंतर त्याच्यावर महापालिकेच्या सायन रुग्णालयात त्वरित उपचार सुरू करण्यात आले. वेळेत रुग्णालयात तरुणाला दाखल केल्यानं त्याचं प्राण वाचले आहेत.

ही घटना शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. सीएसएमटीहून पनवेल लोकलवर मोटरमन सूर्यकांत पाटील आणि गार्ड बबलू कुमार कार्यरत होते. शनिवारी मध्यरात्री या लोकलनं चुनाभट्टी स्थानक सोडताच बाजूच्या रुळांवर विनायक परब जखमी अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी लोकल थांबवत तात्काळ मदतकार्य राबविलं.



हेही वाचा -

नीरव मोदीच्या संपतीचा या दिवशी होणार लिलाव

शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर व्हर्टीकल गार्डन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा