Advertisement

शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर व्हर्टीकल गार्डन

मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेनं (BMC) हरित पट्टा निर्माण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे

शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर व्हर्टीकल गार्डन
SHARES

मुंबईतील प्रदूषणात (Pollution) दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. वाढत्या प्रदूषणाचा फटका मुंबईकरांना बसत असून, परिणामी आजारांना सामोरं जावं लागतं आहे. त्यामुळं मुंबईकरांची यातून सुटका करण्यासाठी तसंच, मुंबईतील प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेनं (BMC) हरित पट्टा निर्माण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

या अंतर्गत मियावाकी पद्धतीनं नागरी वन तयार करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. त्यानुसार, दादरमधील शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर (Bus Stop) व्हर्टीकल गार्डन (Vertical Garden) बहरणार आहे. शिवाजी पार्कमधील काही बस स्टॉपच्यामागे झाडांची रोपटं लावण्यात आली आहेत.

मुंबईतील हरित पट्टा नष्ट होत चालला आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत आहे. मात्र, पर्यावरणात समतोल राखण्यासाठी वृक्षसंपदा असणं आवश्यक असल्यानं ३३ कोटी झाडं लावण्याचा संकल्प सरकारनं केला होता. त्यानुसार, महापालिकेलाही आपल्या आवारात ५,९७७ झाड लावण्यास सांगण्यात आले होते. परंतु, मुंबईत जागेची कमतरता असून, काँक्रिटीकरणमुळं झाडं लवकर उन्मळून पडतात. यावर उपाय म्हणून मियावाकी पद्धतीनं महापालिकेनं अवलंबिला आहे.

शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरातील जुन्या महापौर बंगल्यापासून व्हर्टीकल गार्डन (Vertical Garden) म्हणजे उभ्या उद्यानाचा प्रयोगही केला जाणार आहे. या परिसरातील ८ बस थांब्यावर अशा प्रकारे उभं उद्यान बहरणार आहे. तसंच, यामध्ये ठरावीक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि बगीचा असलेली ४.५कि़.मी. लांबीचं पदपथ माहिम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तयार करण्यात येणार आहे. दुभाजक, वाहतूक बेटांवरही छोटे बगीचे बहरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महापालिकेला सुमारे ६ हजार झाडे लावण्याचं लक्ष्य देण्यात आलं होतं. ही झाडं लावण्यासाठी महापालिका तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. एका झाडासाठी ५९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कमी जागेत जास्त झाडं लावण्याची मियावाकी ही जपानी पद्धत अवलंबिण्यात येणार आहे.हेही वाचा -

पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा मुंबई बाहेर

गिरणी कामगारांच्या घराची महिन्याभरात लाॅटरी निघणारRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा