Advertisement

पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा मुंबई बाहेर

एप्रिल २0२0 मध्ये होणारी निवडणूक ताकदीने मनसे लढवणार

पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा मुंबई बाहेर
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वर्धापनदिन सोहळा पहिल्यांदाच मुंबई बाहेर होतोय. हा सोहळा नवी मुंबईत ९ मार्चला मनसेचा १४ वा वर्धापनदिन सोहळा होणार आहे. नवी मुंबई होणाऱ्या पालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमिवर पक्षाला निवडणूकीत यश मिळावे या उद्देशाने वर्धापनदिन नवी मुंबईत घेण्याचे मनसेकडून ठरवण्यात आले आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी इथे हा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे.

नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा मेळावा मनसेच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे. पक्ष स्थापनेनंतर मनसेने २0१0 साली नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती मात्र त्यात पक्षाला यश मिळाले नव्हते. २0१५ साली मनसेने नवी मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवली नाही. आता मात्र एप्रिल २0२0 मध्ये होणारी निवडणूक ताकदीने मनसे लढवणार आहे. तसे संकेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी मनसेच्या नवी मुंबईतल्या पश्‍चिम महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमात उपस्थित असताना दिले आहेत.

मनसे नेते अमित ठाकरे ही गेल्या काही महिन्यांपासून नवी मुंबईत पक्षाच्या वतीने घेण्यात येणार्‍या आंदोलनात आणि कार्यक्रमात सातत्याने सहभागी होत आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेच्या पार्श्‍वभूमीवर अमित ठाकरे यांचा नवी मुंबईतला वावर वाढला आहे.गेल्या काही दिवसात मनसे भाजप जवळीक वाढलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे मनसे स्वबळावर निवडणूक लढणार की भाजपा सोबत जाणार ? अशी ही चर्चा सध्या राजकीय वतरुळात आहे.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा…

महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाच्या वाटेवरून चालण्याचं निश्चित केल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता एक एक करून धार्मिक मुद्द्यांना हात घालू लागली आहे. याच भूमिकेला साजेशी मागणी करत मनसेने औरंगाबादच्या नामांतरणाचा (name change of Aurangabad) मुद्दा हाती घेतला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (mns mla raju patil) यांनी औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर (sambhaji nagar) करावं, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा