Advertisement

गिरणी कामगारांच्या घराची महिन्याभरात लाॅटरी निघणार

राज्य सरकारने गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात आलेली घरे त्यांना विकता येणार नाहीत.

गिरणी कामगारांच्या घराची महिन्याभरात लाॅटरी निघणार
SHARES

मागील अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना लवकरच त्यांच्या हक्काची घरे मिळणार आहे. गिरणी कामगारांसाठी अधिकची घरे उपलब्ध व्हावीत. त्यासाठी मुंबईलगतच्या ९० एकर जमिनीवर घरे उभारण्याबाबत सर्व कायदेशीर  प्रक्रिया  पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर म्हाडाकडील घरांची महिन्याभरात लाॅटरी काढण्याचे निर्देश ही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


मागील अनेक दिवसांपासून गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. नुकतेच सचिन भाऊ आहिर यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांच्या शिष्ठ मंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तासभरच्या या बैठकित उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या गिरणी कामगारापर्यंत घर देण्यास सरकार कठिबद्ध आहे. गिरणी कामगारांनी दिलेला त्याग हा कधीही न विसरणारा आहे. मुंबईतील बाॅम्बे डाइंग आणि श्री निवास  मिलच्या ३८५० तयार घरांची लाॅटरी म्हाडाने १ मार्चला काढावी.  तर पनवेल येथील २५०० घरांची लाॅटरी एमएमआरडीएने १ एप्रिल रोजी काढावी. त्यानंतर ९० दिवसात प्रक्रिया पूर्ण करून  घरांच्या चाव्या गिरणी कामगारांना हस्तांतरित कराव्यात, या कामात आणखी दिरंगाई करू नये अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी या वेळी दिल्या. मात्र राज्य सरकारने  गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्यात आलेली घरे त्यांना विकता येणार नाहीत.असे उद्धव ठाकरे यांनी निक्षून सांगितले. 

 

तसेच मुंबईतील एनटीसीकडील अतिरिक्त जमीन गिरणी कामगारांच्या घरासाठी उपलब्ध व्हावी. यासाठी अधिकाऱ्यांनी अभ्यास करून प्रस्ताव सादर करावा. याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्ठमंडळाला दिले. तर सहिन आहिर यांनी  इंदू मिलमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  स्मारकाच्या जागेपोटी एनटीसीला टीडीआरच्या माध्यमातून १४०० कोटी  मिळणार आहेत. त्यातील निम्मी रक्कम त्यांनी महाराष्ट्रातच खर्चावी अशी माहणी सचिन आहिर यांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावण मंत्री आदीत्य ठाकरे यांच्यासह कामगार शिष्ठमंडळातर्फे कामगार नेते दत्ता इस्वलकर, आण्णा शिर्सेकर, निवृत्ती देसाई हे उपस्थित होते. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा