Advertisement

Complete lockdown in north mumbai: उत्तर मुंबईतील ‘या’ भागात कडक लाॅकडाऊन

मुंबईतील धारावी, वरळीतील कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना उत्तर मुंबई कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत चालला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून या भागात कडक लाॅकडाऊन लागू करण्याचा निर्णय मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

Complete lockdown in north mumbai: उत्तर मुंबईतील ‘या’ भागात कडक लाॅकडाऊन
SHARES

मुंबईतील धारावी, वरळीतील कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना उत्तर मुंबई कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनत चालला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून या भागात कडक लाॅकडाऊन (Complete lockdown in north mumbai) लागू करण्याचा निर्णय मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

पश्चिम उपनगर विशेषकरून उत्तर मुंबईतील काही भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून उत्तर मुंबईत जीवनावश्यक सेवा वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे  सील इमारतींमधील नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. महापालिकेचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात प्रामुख्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणं, तोंडाला मास्क न लावण्याचे प्रकार नजरेस आल्याने हे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

उत्तर मुंबईत १३ ते १८ जून दरम्यान ४४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तर दहिसर पूर्वेकडे ७६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. 

हेही वाचा - सायन रुग्णालयातील ९९ डाॅक्टारांसह १९० हून अधिक कर्मचारी कोरोनाग्रस्त

सहपोलिस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) विनय चौबे यांनी उत्तर मुंबई प्रादेशिकचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत, उपायुक्त डी. एस. स्वामी, उपायुक्त डॉ. मोहन दहिकर, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त कबरे आदींसोबत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पी-उत्तर (P North) विभागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक उपाययोजना लागू करण्याचं ठरवण्यात आलं. 

सद्यस्थितीत मालाडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे मालाड पूर्वेकडील अप्पापाडा, कोकणीपाडा येथील कडक लाॅकडाऊन पुढंही सुरू राहील, असं महापालिका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. याचप्रमाणे कांदिवलीतील पोयसर, बोरीवली पूर्वेकडील काजूपाडा आणि दहिसर पूर्वेकडील अंबावाडी केतकीपाडा येथील लाॅकडाऊनही असंच सुरू राहणार आहे.

उत्तर मुंबईतील परिमंडळ ११ आणि १२ अंतर्गत येणाऱ्या परिसरात पोलिस कर्मचाऱ्यांसोबतच राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जादा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा - List Of Sealed Buildings In Mumbai: मुंबईतील सील केलेल्या इमारतींची 'ही' आहे यादी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा