Advertisement

मीटर रिकॅलिब्रेटवरून भाडेवाढीचा गोंधळ

अचूक भाडे सुनिश्चित करण्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशन आवश्यक आहे. परिवहन विभागाने क्यूआर कोड आधारित टॅरिफ कार्ड सुरू केले आहेत.

मीटर रिकॅलिब्रेटवरून भाडेवाढीचा गोंधळ
SHARES

1 फेब्रुवारी रोजी सुधारित ऑटो आणि टॅक्सी भाडे लागू झाल्यानंतर पाच दिवस उलटूनही इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट (meter racalibrate) करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भाडे (rate hike) आकारले जाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अचूक भाडे सुनिश्चित करण्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशन आवश्यक आहे. परिवहन विभागाने (RTO) क्यूआर कोड आधारित टॅरिफ कार्ड सुरू केले आहेत. केवळ हे कार्ड प्रदर्शित करणाऱ्या किंवा रिकॅलिब्रेटेड मीटर वापरणाऱ्या वाहनांनाच सुधारित भाडे आकारण्याची परवानगी आहे.

परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत, संबंधित खर्चात किंवा नियामक चौकटीत कोणताही बदल झालेला नाही असे सांगितले होते. असे असूनही तपशीलवार कोणतेही लेखी निर्देश नाहीत असे मीटर दुरुस्ती करणाऱ्यांचा दावा आहे.

स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांच्या अभावामुळे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस (आरटीओ) आणि मीटर दुरुस्ती करणाऱ्यांमध्ये ऑटो आणि टॅक्सींसाठी इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेशन वरून वाद निर्माण झाला आहे.

दोन्ही पक्षांमधील अलिकडच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही कारण मीटर दुरुस्ती करणाऱ्यांना त्यांचे आक्षेप थेट राज्य परिवहन विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मुंबई (mumbai) महानगर प्रदेशात चार लाखांहून अधिक ऑटोरिक्षा आणि 20,000 टॅक्सी आहेत. 1 फेब्रुवारीपासून भाडे सुधारणा लागू झाली होती. ज्यामुळे ऑटो आणि टॅक्सींसाठी मूळ भाडे 3 रुपयांनी वाढले.

सुधारित भाडे रचनेनुसार, ऑटो रिक्षांसाठी मूळ भाडे 23 वरून 26 रुपये झाले आहे. तर काळ्या-पिवळ्या टॅक्सी आता 28 ऐवजी 31 रुपये आकारतात. एसी कूल कॅबसाठी पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी भाडे 40 वरून 48 रुपये झाले आहे.

मीटर दुरुस्ती करणाऱ्यांनी रिकॅलिब्रेशन शुल्काबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की  “इलेक्ट्रॉनिक मीटर रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च 700 रुपये निश्चित केल्यास आम्हाला कोणताही आक्षेप नाही, असे आम्ही अधिकाऱ्यांना कळवले आहे.

तथापि, त्यांनी मीटर रीप्रोग्रामिंगसाठी चिप उत्पादकांनी लावलेले वाढीव शुल्क, चाचणी केंद्रांवरील शुल्क आणि परमिट धारकांसाठी आमचे सेवा शुल्क यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष दिलेले नाही,” असे एका मीटर दुरुस्ती करणाऱ्याने सांगितले.

सरकारने रिकॅलिब्रेशनचा खर्च प्रति मीटर 700 रुपये निश्चित केला आहे. ज्यामध्ये प्रोग्राम केलेल्या चिपसाठी 280 रुपये आणि चाचणीसाठी 100 रुपये समाविष्ट आहेत. तथापि, मीटर दुरुस्ती करणाऱ्यांचे असे मत आहे की प्रत्यक्ष बाजारभाव जास्त आहे, ज्यामुळे सरकारने ठरवलेली किंमत आकारणं अशक्य आहे.

रिकॅलिब्रेशन प्रक्रियेत स्पष्टतेचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. काही ऑटो आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडे टॅरिफ कार्ड किंवा सुधारित भाडे चार्ट न दाखवता जास्त भाडे मागितले आहे.

सरकारने असे आदेश दिले आहेत की चालकांनी अपडेटेड भाडे चार्ट प्रदर्शित करावेत जे ऑटो आणि टॅक्सी युनियन्सना वितरित केलेले आहेत.

“नवीन भाडे चार्ट प्रदर्शित न करणाऱ्या चालकांनी प्रवाशांकडून जास्त पैसे घेतले तर आम्ही कठोर कारवाई करू,” असे राज्य परिवहन आयुक्त विवेक भिमनवार म्हणाले.



 हेही वाचा

पनवेल : कर्नाळा पक्षी अभयारण्याचा होणार कायापालट

मुंबई महानगरपालिका पाच नवीन अग्निशमन केंद्र बांधणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा