Advertisement

बांधकाम कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन


बांधकाम कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन
SHARES

सीएसटी - विविध प्रलंबित मागण्या आणि थकबाकीसाठी बांधकाम कामगारांनी आझाद मैदानात मंगळवारपासून आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्रात 35 लाख बांधकाम कामगार असून 5 लाख 22 हजार कामगारांच्या नोंदी झालेल्या आहेत.

बांधकाम कल्याणकारी मंडळात 6 हजार कोटी जमा झाले असून फक्त 122 कोटी 4 लाख खर्च केले आहेत. बांधकाम कामगारांच्या मुलांमुलीसाठी आणि मयत कामगारांच्या पत्नींसाठी काही पैसे आणि पेन्शन दिली जाते, ती अद्याप मिळाली नसल्याची माहिती बांधकाम कामगार संघटना फेडरेशन आयटकचे अध्यक्ष शंकर पुजारी यांनी दिली.

भारतामध्ये काही राज्यात कामगारांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी पैसे दिले जातात, पण महाराष्ट्रात दिले जात नाहीत. 17 कोटी 59 लाख रूपयांचे चेक बाउन्स झालेले आहेत. त्यांच्यावर अजून कारवाई केलेली नाही. सांगली जिल्हयातील सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी स्वतःचा एक नातेवाईक 17 वर्षाचा असताना 18 वर्ष पूर्ण दाखवून कामावर घेतले. त्यामुळे अनिल गुरव यांना निलंबित करून चौकशी करावी, अशी मागणी बांधकाम कामगारांची असल्याचे शंकर पुजारी यांनी सांगितले. तसंच बांधकाम मंत्री यांनी आम्हाला लागू असलेले पैसे ताबडतोब द्यावेत अशीही मागणी असल्याचं पुजारी यांनी सांगितलं. या वेळी बांधकाम कामगारांच्या वतीने प्रभाकर र्शिदे, मधुकर खिलारे, संजय मंडवधरे हजर होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा