Advertisement

कुर्ल्यात दुमजली इमारतीचा कोपरा ढासळला


कुर्ल्यात दुमजली इमारतीचा कोपरा ढासळला
SHARES

 मुंबईत गुरूवारी पडत असलेल्या पावसात कुर्ल्याच्या एल वार्डातील निता इमारतीचा कोपरा ढासळल्याची घटना दुपारी १२ च्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतिही जिवीत हानी झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून ढासळलेल्या कोपऱ्याचे रॅबिट उचलण्याचे काम सुरू आहे.

मुंबईत गुरूवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. या पावसात कुर्ला एल वार्डात नेताभ लाईनवरील निता इमारतीचा कोपरा दुपारी १२ च्या सुमारास ढासळला. कित्येक वर्ष जुनी झालेल्या या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले होते. या इमारतीत काही कुटुंबिय वास्तव्यास होते. या घटनेनंतरर इमारत रिकामी करण्यात आली असून अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलेले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतिही जिवीत हानी झाली नसल्याचे पालिका नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे. सध्या ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचाः- अभिनव कश्यपच्या आरोपांवर सलमानच्या वडिलांचे प्रत्युत्तर

हेही वाचाः- पूर्व वैमन्यस्यातून चेंबूरमध्ये गोळ्या घालून एकाची हत्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा