पूर्व वैमन्यस्यातून चेंबूरमध्ये गोळ्या घालून एकाची हत्या

. पूर्व वैमन्यस्यातून शाहीदची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पूर्व वैमन्यस्यातून चेंबूरमध्ये गोळ्या घालून एकाची हत्या
SHARES

चेंबूरच्या टिळकनगर परिसरात दोघा जणांनी पहाटे एकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी नवनितसिंग राणा आणि यासिन नावाच्या आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. तर या घटनेत शादीक खान (३६) याचा मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे.

हेही वाचाः- रिया चक्रवर्ती चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात हजर

चेंबूरच्या टि.वाय मार्गावरील रमाबाई काँलनीत शादीक हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. गुरूवारी पहाटे शादीर हा त्याच्याघराजवळ असताना. नवनितसिंग राणा आणि यासिन या दोघांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. राणाने त्याच्याजवळी पिस्तुलीतून शादीकवर दोन गोळ्या झाडल्या, या गोळ्या शादीकच्या हातावर आणि पाठीवर लागल्याचे सांगितले जाते. पहाटेच्या वेळी गोळ्या झाडल्याच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. शादीरवर गोळ्या झाडून दोन्ही आरोपींना पळ काढला. स्थानिकांनी शादीदला तातडीने सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डाँक्टरांनी शाहिदला तपासून मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूर्व वैमन्यस्यातून शाहीदची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा